

बॉलीवुडतील दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांच्या आठवणीत त्यांच्या लोकप्रिय चित्रपट ‘यमला पगला दीवाना’ ला पुन्हा थियेटरमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर उत्साहाने स्वागत केले होते. त्यानंतर चित्रपटाचे दुसरे भागही आले. त्यांच्या चाहत्यांना एक अनमोल भेट देण्याच्या हेतूने चित्रपट रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे.
Yamla Pagla Deewana re-released in theater
मागील महिन्यात २४ नोव्हेंबर रोजी बॉलिवूडचे ही-मॅन दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले होते. अद्यापही त्यांचा परिवार आणि चाहते त्या दु:खातून बाहेर पडलेले नाहीत. दरम्यान, आता धर्मेंद्र यांचा हिट चित्रपट 'यमला पगला दीवाना' पुन्हा चित्रपटगृहात रिलीज होऊ शकतो. या चित्रपटामध्ये सनी देओल आणि बॉबी देओल देखील दिसणार आहेत. या चित्रपटाच्या रि-रिलीजच्या माध्यमातून दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली दिली जाईल.
चित्रपटाचे रि-रिलीजचे आयोजन?
रिपोर्टनुसार, 'यमला पगला दीवाना' पुन्हा त्या व्यक्तीसाठी श्रद्धांजली होईल, ज्याने सर्वांवर प्रेम केलं आणि सिनेमा जगतात छाप सोडली. हा चित्रपट पुन्हा रिलीजसाठी योग्य आहे. कारण, हा चित्रपट खूप जुना नाही, आज देखील ताजे आणि मनोरंजक वाटतो.'
त्यांनी सांगितले की, हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी पुन्हा रिलीज करण्याची योजना होती, परंतु, 'धुरंधर'ची लोकप्रियता पाहता तारीख बदलण्यात आली आहे.
नवी तारीख निश्चित?
सूत्रांच्या माहिती नुसार, 'यमला पगला दीवाना' चित्रपटाचे हक्क असणारा NH स्टुडियोजने या नियोजनात बदल केला आहे. आता चित्रपट १ जानेवारी, २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होण्याची अपेक्षा आहे. शेवटी निर्णय काही दिवसांमध्ये घेतला जाईल.'
धर्मेंद्र आणि त्यांच्या मुलांची मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी केलं होतं. या रि-रिलीजच्या निमित्ताने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, कारण धर्मेंद्र यांचा अगदी जवळचा संबंध ‘यमला पगला दीवाना’ या चित्रपटाशी होता. अनेक चाहते सोशल मिडियावर आपली प्रतिक्रिया देत आहेत आणि हे चित्रपट पुन्हा पडद्यावर पाहण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.