

२०२५ मध्ये चित्रपटप्रेमींनी धमाल केली आणि बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांनी इतिहास रचला. अनेक जुने फ्रँचायझी चित्रपट आणि नवीन कथेचा प्लॉट घेऊन आलेले चित्रपट सिनेप्रेमींच्या पसंतीस पडले आहेत.
Bollywood Box Office Hits 2025 top movies
२०२५ हे वर्ष बॉक्स ऑफिससाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरले आहे. यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत बॉलिवूडसह विविध देशांतील चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे.
सैयारा- रोमँटिक ड्रामा सैयाराचे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले होते. आहान पांडे, अनीत पड्डा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या लव्ह स्टोरीने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली. पाचशे कोटी पार चित्रपटाने कमाई केली.
Mahavatar Narsimha - अॅनिमेटेड पौराणिक महाकाव्यावर आधारित महावतर नरसिंहाने बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटी पार केले होते. भारतीय अॅनिमेटेड चित्रपटांमध्ये या चित्रपटाने महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे.
War 2 - अॅक्शन थ्रीलर सीक्वेल बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला.
चित्रपट (कोटी रुपये) कमाई -
Chhaava (७९७ कोटी) - Chhaava हा २०२५ मधील सर्वात मोठा बॉलिवूड हिट आहे. ज्याने जवळपास worldwide ८०० कोटी रुपये कमावले.
Saiyaara (५५५ कोटी) -या रोमँटिक ड्रामाने अपेक्षेपेक्षा जास्त जवळपास वर्ल्डवाईड ५८० मिळवून अव्वल चित्रपटात स्थान मिळवले. भारताबरोबर परदेशातही खूप कमाई केली.
War 2 (३०३ कोटी) - वॉर २ सह सितारे जमीन पर, रेड २, हाऊसफुल ५ हे सर्व चित्रपट २०२५ मध्ये अधिक कमाई करणारे ठरले.
Sitaare Zameen Par २६६ कोटी, Raid- 2 : २४३ कोटी, Housefull 5- २४३, Sikandar १७६ कोटी, Sky Force १६८ कोटी, Kesari Chapter- 2 : १४४ कोटी, Jaat ११२ कोटी.
चीनी अॅनिमेटेड नेझा २ने जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळवला. डिस्नेच्या ‘लिलो & स्टिच’ आणि ‘A Minecraft Movie’ या दोन चित्रपटांनी एक अब्ज डॉलर क्लबमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर ‘ए माईनक्राफ्ट मूव्ही’ या गेमवर आधारित चित्रपटानेही जगभरात जबरदस्त प्रतिसाद मिळवला.
जुरासिक वर्ल्ड: रिबर्थ, डिमन स्लेयअर: इन्फिनिटी कॅसल, तसेच F1: द मूव्ही, सुपरमॅन, मिशन: इम्पॉसिबल - द फायनल रीकॉनिंग आणि द फँटास्टिक फोर: फर्स्ट स्टेप्स चित्रपटांनीही मोठी कमाई केली.