हॉलीवूड अभिनेता विल स्मिथने शाहरूख खानकडे मागितले काम

हॉलीवूडचे कलाकारही भारताच्या बॉलीवूड प्रेमात असल्याचे दिसून येते.
Will Smith Asks Shah Rukh Khan To Cast Him  A Hindi Movie
हॉलीवूड अभिनेता विल स्मिथने शाहरूख खानकडे मागितले काम Film Photo
Published on
Updated on

Will Smith Asks Shah Rukh Khan To Cast Him In A Hindi Movie

पुढारी ऑनलाईन :

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान सध्या आपल्या अपकमिंग चित्रपट 'किंग' मध्ये व्यस्त आहे. दरम्यान हॉलीवूडचा एक दिग्गज कलाकाराने शाहरूख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Will Smith Asks Shah Rukh Khan To Cast Him  A Hindi Movie
आई-वडिलांची सेवा न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार १० टक्के कपात

जसे बॉलीवूडचे कलाकार हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्‍सुक असतात त्‍याच प्रमाणे हॉलीवूडचे कलाकारही भारताच्या बॉलीवूड प्रेमात असल्याचे दिसून येते. त्‍याचमुळे एका हॉलीवूडच्या अभिनेत्‍याने शाहरूख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हॉलीवूड अभिनेता विल स्मिथने भारतीय अभिनेत्‍यांसोबत आपल्याला काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करू असे म्हटले आहे.

शाहरूख खानसोबत काम करण्याची इच्छा

गल्फ न्यूजसोबत काम करताना विल स्मिथने शाहरूख खानविषयी आपले मत व्यक्त केले. त्‍याने शाहरूख खानचे स्टारडम आणि त्‍याची जागतिक स्तरावर असलेली ओळख याचे कौतूक केले. तो म्हणाला की, मी स्वत:हा शाहरूखसोबत या विषयावर संपर्क साधला आहे. माझी इच्छा आहे की, शाहरूखने मला त्‍याच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये घ्यावे. त्‍यामुळे विल स्मिथ शाहरख खानसोबत काम करणार असल्याच्या चर्चांना सुरूवात झाली आहे.

Will Smith Asks Shah Rukh Khan To Cast Him  A Hindi Movie
इराणवर युद्धाचे ढग! अमेरिका वॉर मोडमध्ये, आपल्या नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश

सलमान आणि अमिताभसोबतही चर्चा

विल स्मिथने बॉलीवूडमधील काही दिग्गज अभिनेत्‍यांसोबतही याआधी बोलल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला मी सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही चर्चा केली आहे. मात्र यानंतर कोणताही तसा चित्रपट बनू शकला नाही.

या सीरीजमध्ये दिसणार विल स्मिथ?

विल स्मिथ 'पोल टू पोल विद विल स्मिथ' रिलीजच्या तयारीत आहे. ही एक उच्च क्षमतेच्या ताकदीशी संबंधित सीरीज आहे. ज्यामध्ये 100 दिवसांपर्यंत जगातील कठीण परिस्थितीत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतःला आव्हान देण्याचे त्याचे प्रयत्न यात दिसून येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news