
मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा आता यशस्वी अभिनेत्री असली तरी सुरुवातीच्या दिवासात तिला अनेकदा हेटाळणीचा सामाना करावा लागला होता. प्रियंका जरी मिस वर्ल्ड झाली असली तरी त्यावेळच्या सौंदर्य मापदंडाविरोधात ती बरीच सावळी होती. पण या सगळ्या अडथळ्यांवर मात करत प्रियंका आता आंतरराष्ट्रीय कलाकार बनली आहे.
पण ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनीही प्रियंका चोप्राला तिच्या दिसण्यावरून जज केले होते. खुद्द स्मिता यांनी हा किस्सा एका यूट्यूब चॅनेलसोबत शेयर केला आहे. या मुलाखतीमध्ये स्मिता यांनी प्रियंकाचे लूक्स आणि कलरवर कमेंट केली होती. त्यामुळे हिला अभिनय येईल की नाही अशी शंकाही त्यांना वाटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किस्मत सिनेमादरम्यान तिची आणि स्मिता यांची पहिली भेट झाल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणतात, ‘ मी प्रियंकाच्या करियरच्या सुरुवातीला तिच्यासोबत काम केले होते. त्यावेळी ती अतिशय कृश आणि सावळी दिसत होती.
माझी आणि मोहन जोशी यांची तिच्याशी भेट घालून दिली गेली होती. सिनेमाची नायिका म्हणून तिला पाहताच मी आश्चर्यचकित झाले. आम्हाला सांगितले गेले होते की ती आमच्या मुलीच्या भूमिकेत असणार आहे. तिला पाहताच मी हे भगवान असे उद्गार काढले होते. त्यावेळी अगदीच वेगळी दिसत होती. अभिनेत्री म्हणून तिच्यात काहीच नव्हते. मी मनात म्हणले अशा मुली अभिनेत्री कशा बनतात देव जाणे!
पण नंतर बराचकाळ बदलला. प्रियंकानेही अभिनेत्री म्हणून स्वत:ला खूप ग्रूम केले. केवळ मिस वर्ल्ड या बिरुदावर समाधान न मानता एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिने स्वत: ला सिद्ध केले.
यानंतर स्मिता यांना प्रियंकाला तिच्या लूक्सवरुन जज करण्याबाबत वाईट वाटले. त्यापुढे म्हणतात, प्रियंका कमाल होती. मी विचार केला या मुलीने काय केले. ती पूर्णपणे दिवा बनली होती. आपण एखाद्याबाबत असे बोलणे कधी चुकीचे ठरू शकते माहिती नाही. कधी कोण कुठे चमकेल हे सांगता येत नाही.
गुड्डू धनोआ दिग्दर्शित या सिनेमात बॉबी देओल आणि प्रियंका हे मुख्य भूमिकेत होते. कबीर बेदी, संजय नार्वेकर, स्मिता जयकर, मोहन जोशी, आशीष विद्यार्थी हे मुख्य भूमिकेत आहेत.
प्रियंका सध्या हेडस ऑफ स्टेट या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. यात जॉन अब्राहम आणि ईद्रीस अल्बा हे कलाकार आहेत.