

लिव्हर कॅन्सरच्या सर्जरीनंतर अभिनेत्री दीपिका कक्करला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. आपल्या प्रकृतीची अपडेट ती फॅन्ससोबत सतत शेयर करते आहे. यादरम्यान शोएबने त्याच्या नवीन व्लॉगमध्ये दीपिकाच्या ट्रीटमेंटबाबत अपडेट दिली आहे. डॉक्टरांशी झालेले बोलणे शोएबने चाहत्यांशी शेयर केले आहे.
तो म्हणतो, दीपिकाचा ट्यूमर खूपच अग्रेसिव्ह आहे. त्यामुळे हा पुनः पुनः येण्याचे चान्सेस खूप वाढतात. हे ऐकल्यावर फॅन्सनी दीपिकाच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली आहे.
दीपिका आणि शोएबने डॉक्टरांची भेट घेतल्यावर शोएबने व्हीडियो शेयर केला. यात तो म्हणतो, पाहिल्यांदा डॉक्टरांनी सर्जरीच्या सहा आठवड्यांनंतर ट्रीटमेंट सुरू करण्यास सांगितले होते. यासाठी त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांचीही भेट घेतली होती.
त्यांनी सांगितले की दीपिका सध्या ठीक आहे. ती तिचे नॉर्मल रुटीन सुरू करू शकते. पण दीपिका वेट ट्रेनिंग आणि योगा करण्याची परवानगी मात्र दिलेली नाही. तसेच तिला तेलकट आणि मसालेदार जेवण करण्यापासून परावृत्त केले आहे.
पुढे शोएब म्हणतो की, त्याला पहिल्यांदा वाटले होते की सर्जरीनंतर उपचार संपतील. पण अजून बरेच काही बाकी आहे. सुदैवाने शरीरात आता कॅन्सर सेल्स नाहियेत. पण बायोप्सि रिपोर्टमध्ये दिसलेला ट्यूमर प्रत्यक्षात अधिक भयानक होता. हा स्टेज 3चा ट्यूमर होता. तो अग्रेसिव्ह प्रकारातला असून लक्षात येण्यास बराच वेळ लागतो.
यावर दोन्ही डॉक्टरांनी सुचवलेला उपाय असा आहे की जेव्हा लिव्हरमध्ये ट्यूमर होतो तेव्हा केमोथेरपी काम करत नाही. यावर इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी हाच उपाय आहे. यामुळे कॅन्सर परत येण्याची शक्यता वाढते. यामध्ये पेशंटला रोज औषधे घ्यावी लागतात. आणि दर 21 दिवसांनी दवाखान्यात जावे लागते.