
Dipika Chikhlia on Sai Pallavi as Sita
रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये विशेष भूमिका निभावणारी अभिनेत्री दीपिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्या व्यक्तिरेखेतील सात्विकता आणि शालीनता यामुळे दीपिका यांचा चेहरा आजही भारतीय प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
दीपिका पुन्हा चर्चेत आल्या आहेत ते साई पल्लवी हिच्यावरील कमेंटमुळे. नुकताच नितेश तिवारीच्या 'रामायण'चा टीजर नुकताच समोर आला आहे. यात रणबीर कपूर श्रीरामाच्या भूमिकेत तर साईपल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसते आहे.
एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना दीपिका यांनी मत व्यक्त केले. त्या म्हणतात, प्रामाणिकपणे सांगायचे तर मला ईफेक्टस आवडले. पण मला स्वतला असे वाटते की रामायण म्हणजे केवळ ग्राफिक्स किंवा तंत्रज्ञान नाही. ही भावनांची गोष्ट आहे.टीजरपाहून गोष्टीचा अंदाज आला नाही. पण याचा मॉडर्नपणा उठून दिसत होता. त्याचे इफेक्टस आणि रंग पाहून याला नवीन रूप असल्याचे जाणवले.’
दीपिका पुढे म्हणतात, मी रामायणात काम केले त्यावेळी तंत्रज्ञानाला मर्यादा होती. पण त्याचे गारुड प्रत्येक मनावर होते. आताच्या टीजरमध्ये भव्यता आहे. पण त्याच्या भावनिक जोडणीबाबत पुढे समजेलच.
यापुढे साई पल्लवीच्या निवडीबाबत बोलताना त्या म्हणतात, ‘ती चांगली अभिनेत्री आहे. मी तिचे मल्याळम सिनेमे पाहिले आहेत. तिचा अभिनय नैसर्गिक आहे. ती सितेच्या पात्राला न्याय देऊ शकेल अशी मला आशा आहे. ती माझ्यासारखी सीता बनू शकणार नाही. पण तिचे काम व्यवस्थित करेल.
अरुणजी यांची माझ्या मनात रामाची छबी आहे. मी जेव्हा स्क्रीनवर त्यांना पाहिले तेव्हा माझ्या मनात हेच आले की अरे हे तर रामजी आहेत. त्यावेळी त्यांना दशरथाच्या रूपात पाहणे अवघड होते माझ्यासाठी.
रामायण पुन्हा पडद्यावर पाहणे अत्यंत आनंददायी आहे. पण जो प्रभाव आमच्या रामायणने सामान्य माणसाच्या मनावर केला होता. तोच प्रभाव या रामायणामुळे पडेल अशी इच्छा आहे.