

Sara Arjun in Dhurandhar Movie:
बॉलीवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंह सध्या चांगलाच चर्चेत आहे. रणवीर पुनः एकदा दमदार व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या समोर येण्यास सज्ज झाला आहे. पण रणवीरपेक्षाही लक्षवेधी ठरली आहे त्याची या सिनेमातील नायिका सारा अर्जुन. सारा अर्जुन हे नाव जाहिरात क्षेत्राला नवीन नाही. साराने आजवर जवळपास 100 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच सारा अनेक ब्रँडसचा चेहरा बनली.
वयाच्या 18 महिन्यांपासून सारा कॅमेराला सामोरी जाते आहे. मुंबईत जन्म झालेल्या साराची पार्श्वभूमी कलेची आहे. साराचे वडील राज अर्जुन हे अभिनेता आहेत तर आई सान्या अर्जुन नृत्य शिक्षिका आहे.
एक अभिनेत्री म्हणून तिचे पदर्पणातील सिनेमाने कौतुक झाले. तमिळ सिनेमा देईवा थीरुमगल या 2011 मध्ये आलेल्या सिनेमाने तिचे खूपच कौतुक झाले. या सिनेमात तिने विकलांग वडील असलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. तिच्या या भावनिक अभिनयाने प्रत्येकाची मने जिंकली. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता विक्रमने काम केले होते.
याशिवाय तिने तमिळ, तेलुगू मल्याळम आणि हिंदी सिनेमातही काम केले होते. यामध्ये सैवम, एक थी डायन, जज्बा, सांड की आंख आणि अजीब दास्ता है या सिनेमांचा समावेश आहे. या सर्व सिनेमांनी तिला बालकलाकार म्हणून प्रस्थापित केले.
आता सारा आगामी धुरंधरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नायिका म्हणून हा तिचा पहिलाच सिनेमा असेल. यात ती अभिनेता रणबीरसिंग सोबत दिसणार आहे.
धुरंधर हा एक अॅक्शन थ्रीलर आहे. उरी फेम आदित्य धर या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. धुरंधर एका गुप्तहेराची गोष्ट आहे. या सिनेमात सारा रणबीरची नायिका बनली आहे. नायिका म्हणून हा तिचा पहिलाच सिनेमा असणार आहे. पदार्पणातच रणबीरसोबत सिनेमा मिळाल्याने आगामी मोठे बॅनर तिच्याकडे येतील यात शंका नाही.
आदित्य धरचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा खऱ्या घटनांवर बेतला असल्याचे सांगितले जाते. एका सीक्रेट मिशनवर असलेल्या एजंटची ही गोष्ट आहे. या सिनेमात सारा आणि रणवीरसह संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल हे कलाकार दिसणार आहेत.
सारा आणि अर्जुन या जोडीतील वयाच्या अंतराने अनेकांचे लक्ष वेधले आहे. रणबीर 40 वर्षांचा आहे तर सारा केवळ 20 वर्षांची आहे. अर्थात या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल हे पाहणे रंजक ठरेल.