पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लापता लेडीज' फेम स्पर्श श्रीवास्तव सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने दीपकची भूमिका साकारली होती. लापता लेडीज चित्रपट सशक्तीकरण आणि आत्मशोधाची कहाणी आहे. जी दोन तरुणांवर आधारित आहे. स्पर्शला कला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करायला १० वर्षे लागली.
राजस्थानच्या राजाखेडामध्ये जन्मलेले स्पर्श श्रीवास्तवने एक डान्सर म्हणून आपले करिअर सुरू केले होते. त्याने २०१० मध्ये रिॲलिटी शो 'चक धूम धूम' मध्ये भाग घेतला होता. ११ वर्षांचा असताना स्पर्शने 'बालिका वधू' मालिकेत 'कुंदन' ची भूमिका साकारली होती.
त्याला 'फियर फाईल्स' आणि 'महाराजा रणजीत सिंह' यासारख्या शोमध्येदेखील पाहण्यात आले होते. २०२० मध्ये त्याचे आयुष्यच पालटले. त्याची क्राईम-बेस्ड सीरीज 'जामताडा-सबका नंबर आएगा' साठी निवड झाली. क्राईम-बेस्ड सीरीज 'जामताडा-सबका नंबर आएगा' मध्ये 'सनी'ची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते.
'जामताडा : सबका नंबर आएगा' च्या यशानंतर आमिर खानने त्याच्या परफॉर्मन्ससाठी खूप कौतुक केले. त्यासाठी त्याला कॉल केला होता. पण स्पर्शला वाटले की, स्पॅम कॉल आहे. म्हणून त्याने फोन कट केला.
यावषियी स्पर्शने एका मुलाखतीत सांगितले की, "मला विश्वास नव्हता. तर मी सरांना एक व्हाईस नोट पाठवण्यासाठी सांगितले. तेव्हा ते म्हणाले की, ते थोड्या वेळात त्याला व्हिडिओ कॉल करतील.'
स्पर्श पुढे म्हणाला की, 'मी हा विचार करत होतो की, मला मुर्ख बनवलं जात आहे. पण जेव्हा मी पाहिलं की, ते ठिक उजडात बसले आहेत. त्यांची स्किन ग्लो करत होती आणि त्यांनी क्रीम कलरचा शर्ट घातला होता आणि मी खूप उत्सुक झालो'.
आमिर खान मुलाखतीत म्हणाला की, 'मी दुसऱ्यांची परफॉर्मन्स कागदावर पाहू शकतो. पण, स्पर्शची भूमिका कागदावर इतकी स्पष्टपणे लिहिली गेली नव्हती.' त्याच्याकडे करण्यासारखे काही नव्हते. तो फक्त घाबरुन इकडे-तिकडे पळत होता, पण, मी जेव्हा त्याचा अभिनय पाहिला, तेव्ही मी थक्क झालो.'
हेदेखील वाचा-