Anniqa Jamal Iqbal: पाकिस्तानी सुंदरी अनिका जमाल इक्बाल कोण? 73 वर्षांनंतर मिस वर्ल्ड स्पर्धेत पहिल्यांदाच एन्ट्री; देशात खळबळ

Who Is Anniqa Jamal Iqbal: पाकिस्तान 73 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अधिकृतपणे मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होत असून, 24 वर्षीय अनिका जमाल इक्बाल देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Who Is Anniqa Jamal Iqbal
Who Is Anniqa Jamal IqbalPudhari
Published on
Updated on

Who Is Anniqa Jamal Iqbal: पाकिस्तान आपल्या 73 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होणार आहे. 2026 मध्ये व्हिएतनाम येथे होणाऱ्या 75 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत 24 वर्षीय अनिका जमाल इक्बाल पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणार असून, हा देशासाठी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

लाहोर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात अनिका जमाल इक्बालला 'मिस वर्ल्ड पाकिस्तान 2026' हा अवॉर्ड देण्यात आला. या निवडीमुळे पाकिस्तान प्रथमच अधिकृतपणे मिस वर्ल्ड स्पर्धेच्या मंचावर दिसणार आहे.

पाकिस्तानसाठी ऐतिहासिक घटना

मिस वर्ल्डसारख्या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत पाकिस्तानचा सहभाग ही मोठी घटना मानली जात आहे. मात्र, पारंपरिक आणि पुराणमतवादी विचारसरणी असलेल्या पाकिस्तानमध्ये मॉडेलिंग आणि सौंदर्यस्पर्धांबाबत अनेकदा विरोध होत असतो. त्यामुळे अनिका जमाल इक्बालच्या सहभागावर काही कट्टरपंथी गटांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अनिका जमाल कोण आहे?

24 वर्षीय अनिका जमाल इक्बाल ही केवळ सौंदर्यस्पर्धांपुरती मर्यादित नसून शिक्षणातही पुढे आहे. ती सध्या अकाउंटिंग आणि ऑडिटिंग विषयात मास्टर्सचे शिक्षण घेत आहे. यापूर्वी तिने पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामध्ये:

  • Miss Earth

  • Miss Global

  • Miss Cosmo

  • Miss Eco International

  • Miss Aura International

यांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांचा समावेश आहे. तसेच कोसोवो येथे झालेल्या Miss Freedom of the World स्पर्धेत तिने चार किताब जिंकले आहेत.

मिस वर्ल्ड मंचावरून सामाजिक संदेश

अनिका जमाल इक्बालने सांगितले की, ती मिस वर्ल्डच्या व्यासपीठाचा वापर केवळ सौंदर्यस्पर्धेसाठी नव्हे, तर सामाजिक बदलासाठी करणार आहे. तिच्या मते, पाकिस्तानमध्ये थॅलेसेमिया या आजाराबाबत जनजागृती करणे आणि रुग्णांना अधिक मदत मिळवून देणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या माध्यमातून ती समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तिने स्पष्ट केले.

Who Is Anniqa Jamal Iqbal
The Odyssey BO Day 1: नोलनचा पुन्हा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'द ओडिसी'ने पहिल्याच दिवशी मोडले अनेक विक्रम, किती कोटी कमावले?

'मिस पाकिस्तान वर्ल्ड ऑर्गनायझेशन'ची भूमिका

2002 मध्ये स्थापन झालेली Miss Pakistan World Organization गेली दोन दशके पाकिस्तानी महिलांना आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धांसाठी तयार करत आहे. या संस्थेच्या प्रयत्नांमुळेच पाकिस्तानला यंदा प्रथमच अधिकृतपणे मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

संस्थेच्या प्रमुख सोनिया अहमद यांनी याला पाकिस्तानसाठी ऐतिहासिक क्षण असे संबोधले. त्यांनी सांगितले की, जागतिक मंचावर पाकिस्तानच्या महिलांना आपली प्रतिभा आणि क्षमता सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे.

Who Is Anniqa Jamal Iqbal
RBI Penalty on NBFC: RBIची मोठी कारवाई! मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

पाकिस्तानच्या इतिहासातील या पहिल्या अधिकृत सहभागामुळे मिस वर्ल्ड 2026 स्पर्धेकडे आता केवळ सौंदर्यस्पर्धा म्हणून नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक बदलाचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news