The Odyssey BO Day 1: नोलनचा पुन्हा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'द ओडिसी'ने पहिल्याच दिवशी मोडले अनेक विक्रम, किती कोटी कमावले?

The Odyssey BO Collection Day 1: क्रिस्टोफर नोलन यांच्या 'द ओडिसी' या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी 17.40 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.
The Odyssey box office collection
The Odyssey box office collectionPudhari
Published on
Updated on

The Odyssey Box Office Day 1: दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्या बहुप्रतीक्षित 'द ओडिसी' (The Odyssey) या चित्रपटाने भारतात प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. 17 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, 2026 मधील भारतातील सर्वात मोठ्या हॉलीवूड चित्रपटाच्या ओपनिंगचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.

टॉम हॉलंड, अॅन हॅथवे, झेंडाया, रॉबर्ट पॅटिन्सन, लुपिता न्यॉन्गो आणि मॅट डेमन यांसारख्या दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच मोठ्या प्रमाणात अॅडव्हान्स बुकिंग झाली होती. विशेषतः IMAX शोसाठी महागडी तिकिटेही झपाट्याने विकली गेली होती.

पहिल्या दिवशी किती कमाई झाली?

चित्रपटसृष्टीतील कमाईचा मागोवा घेणाऱ्या Sacnilk या संकेतस्थळानुसार, 'द ओडिसी'ने भारतात पहिल्याच दिवशी 17.40 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. देशभरात सुमारे 8,400 शोद्वारे हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

  • इंग्रजी भाषा: 4,390 शोमधून 13.75 कोटी रुपये, सुमारे 76 टक्के ऑक्युपन्सी

  • हिंदी भाषा: 2,851 शोमधून 1.90 कोटी रुपये

  • याशिवाय तमिळ आणि तेलुगू भाषांमधूनही चित्रपटाने चांगली कमाई केली.

चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे एकूण ग्रॉस कलेक्शन 20.76 कोटी रुपये इतके झाले आहे.

2026 मधील सर्वात मोठी हॉलीवूड ओपनिंग

'द ओडिसी'ने भारतात 2026 मधील सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या हॉलीवूड चित्रपटाचा मान पटकावला आहे. यापूर्वी 'द डेव्हिल वेअर्स प्राडा 2' हा चित्रपट 5.5 कोटी रुपयांच्या ओपनिंगसह अव्वल स्थानावर होता. मात्र, नोलन यांच्या 'द ओडिसी'ने हा विक्रम मोठ्या फरकाने मोडीत काढला.

भारतातील 2026 मधील टॉप हॉलीवूड ओपनिंग (नेट कलेक्शन)

  1. द ओडिसी – 17.40 कोटी रुपये

  2. द डेव्हिल वेअर्स प्राडा 2 – 5.50 कोटी रुपये

  3. मायकेल – 5.40 कोटी रुपये

  4. ईव्हिल डेड बर्न – 3.24 कोटी रुपये

  5. डिस्क्लोजर डे – 1.80 कोटी रुपये

  6. ऑब्सेशन – 1.75 कोटी रुपये

The Odyssey box office collection
Aamir Khan Bishnoi Gang Threat: सलमान खाननंतर आता आमिर खानलाही बिश्नोई गँगकडून धमकी; सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ

'द ओडिसी'बद्दल जाणून घ्या

'द ओडिसी'ला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) 'A' प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटाचा कालावधी 2 तास 52 मिनिटे 33 सेकंद इतका आहे. भारतात हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॅनिश, रशियन आणि जपानीसह अनेक भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

The Odyssey box office collection
Sonam Wangchuk: 'सोनम वांगचुक यांनी...'; आमिर खानची भावनिक प्रतिक्रिया, '3 इडियट्स'मधील 'रँचो'बाबतही केला मोठा खुलासा

क्रिस्टोफर नोलन यांच्या भव्य दिग्दर्शनासोबत दमदार कलाकारांची फौज आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहता, 'द ओडिसी' आगामी दिवसांत बॉक्स ऑफिसवर आणखी मोठी कमाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news