

Walt Disney lay off: वॉल्ट डिस्ने कंपनी ही मनोरंजन क्षेत्रातील एक नावाजलेली आणि अग्रणी कंपनी आहे. मात्र ही कंपनी आपल्या १००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे. ही नोकरकपात कंपनीचे नवीन सीईओ जॉश डीअमारो यांच्या ऑर्गनाईजेशन रिस्ट्रक्चरचा एक भाग आहे. जॉश यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आगामी नोकरकपातीबाबत अंतर्गत मेलवरून माहिती दिली आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार वॉल्ट डिस्नेमधील ही नोकरकपात ही मार्केटिंग विभागातील नोकऱ्यांवर जास्त प्रभावित करणारी असेल. मात्र डिस्ने स्टुडिओ, टीव्ही डिव्हीजन, इएसपीएन प्रोडक्ट अँड टेक्नॉलॉजी टीम आणि काही कार्पोरेट विभागात देखील नोकर कपात होण्याची शक्यता आहे.
डिस्ने हा इतर हॉलिवूड स्टुडिओप्रमाणे या क्षेत्रातील नवीन वास्तव स्विकारत असून आता पांरपरिक टीव्ही प्रक्षेपण आता तेवढा नफा मिळवून देत नाहीये. त्याचबरोबर आठवड्याच्या शेवटीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि इतर टेक जायंट्सकडून मिळणारी स्पर्धा यात वाढली आहे. २०२२ पासून डिस्नेने आतापर्यंत ८००० कामगारांना काढून टाकलं आहे.
बॉब इगर यांच्याकडून गेल्याच महिन्यात सीईओ म्हणून जॉश यांनी कार्यभार स्विकारला आहे. त्यानंतरची त्यांचा हा पहिलाच मोठा आणि कटू निर्णय आहे.
डिस्नेचे साईओ जॉश यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एका अंतर्गत ईमेलद्वारे मेमो दिला आहे. त्यांनी मंगळवारी सकाळी हा धक्का दिला. ते आपल्या मेमोमध्ये डिस्ने कंपनीतील काही विभागांमधून काही पद आणि नोकऱ्या काढून टाकत आहे. याबाबतची कल्पना यापूर्वीच संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.
जॉश यांनी असं करण्याचं कारण देखली आपल्या मेमोमध्ये सांगितलं .ते म्हणाले की, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारी आणि चपळ वर्कफोर्स तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बिजनेस इनसाईडरने दिलेल्या वृत्तानुसार डिस्नेच्या सीईओंनी सांगितलं आहे की ही नोकर कपात म्हणजे कर्मचाऱ्यांचे योगदान प्रतिबिंबत करत नाही.