Job News: कोणतीही डिग्री नाही तरी १९ वर्षाच्या मुलीला BMW ची मिळाली नोकरी; सोशल मीडियावर skills vs education चीच चर्चा

Job News
Job NewsPudhari
Published on
Updated on

Job News skills vs education: सोशल मीडियावर एका १९ वर्षाच्या मुलीला बीएमडब्लू या जागतिक कंपनीत नोकरी मिळाल्याची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या लिंक्डइन पोस्टमध्ये या मुलीने कोणतीही फॉर्मल डिग्री घेतलेली नाही असा उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर सोशल मीडियावर स्कील विरूद्ध पारंपरिक शिक्षण अशी चर्चा सुरू झाली आहे.

Job News
Job News Ghost Hirring: सावधान! १० पैकी ४ कंपन्या काढतात 'फेक' नोकऱ्या... घोस्ट हायरिंग म्हणजे काय, त्यापासून कसं वाचायचं?

या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की कंटेट क्रिएटर गौरी मोरे यांना बीएमडब्ल्यूमध्ये पूर्णवेळ पर्सनल मार्केटिंगची रोल मिळाला आहे. बीएमडब्ल्यू ही जगातील सर्वात मोठी प्रीमियम कार्स आणि बाईकचे उत्पादन करणारी कंपनी आहे. मात्र गौरी यांना ही नोकरी त्यांच्या डिग्रीमुळे किंवा शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर नाही तर सोशल मीडिया प्रेझेंटर म्हणून तयार केलेल्या मजबूत पर्सनल ब्रँडमुळे मिळाली आहे.

Job News
Viral News Job Offer Rejects: सिनिअर पोस्ट अन् ४७ लाखांचं पॅकेज नाकारलं... वनेश माळीची नम्र नकाराची 'ती' पोस्ट चर्चेत

व्हायरल पोस्टमध्ये बीएमडब्ल्यू कंपनीत ही नोकरी मिळवण्यासाठी किमान पाच वर्षाच्या अनुभवाची गरज होती. मात्र असं असलं तरी गौरी यांना ही संधी मिळाली आहे. त्यांच्याकडे अनुभवच काय तर या जॉबसाठी लागणारी डिग्री देखील नाहीये. गौरी यांना ही नोकरी मिळण्यात त्यांचा सोशल मीडियावर असलेला वावर हा एकमेव कळीचा मुद्दा ठरला आहे.

गौरी यांचे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलोअर्स आहेत. यात लिंक्डइनवर त्यांचे ६५ हजार फॉलोअर्स आणि इन्स्टाग्रामवर ३५ हजारापेक्षा जास्त फॉलोअर्सचा समावेश आहे.

Job News
Google CEO सुंदर पिचाईंनी तीन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमधील 'ते' विधान ठरले खरे

गौरी यांना बीएमडब्ल्यूकडून नोकरी मिळताच लिंक्डइन युजर आरूशी लिहितात, 'तिच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची किंमत ही डिग्री किंवा मोठ्या अनुभवापेक्षा जास्त आहे. आता तुम्ही देखील तुमच्या लिंक्डइन आणि इन्स्टाग्रामला तुमचा ड्रीम जॉब मिळवण्यासाठीचा मिनी प्रोजेक्ट समजा.'

मिळालेल्या माहितीनुसार गौरी मोरे यांनी याबाबतची माहिती स्वतःहून लिंक्डइन प्रोफाईलवर दिली आहे. तिने बीएमडब्ल्यूसोबतचा ईमेल संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले होते.

Job News
Meta Layoff Zuckerberg: मेटा तब्बल १५,००० कर्मचारी कपात करणार; झुकरबर्गनं काढून टाकलेला Oculus चा संस्थापक म्हणतो चांगला निर्णय

एका लिंक्डइन युजरने गौरी मोरे बाबत लिहिले की, 'हे फक्त नशीब नाहीये. एक पर्सनल ब्रँड काय करू शकतो याचे हे उदाहरण आहे. मी गेल्या वर्षी पहिल्यांदा गौरी यांचा कंटेट पाहिला होता. त्यावेळी त्यांनी टाटा मोटर्स सोबत भागीदारी केली होती .त्यावेळी त्या फक्त १९ वर्षांच्या होत्या. त्यांच्याकडे कोणती डिग्री नव्हती कोणताही कॉर्पोरेट अनुभव नव्हता. तिने जोपर्यंत योग्य लोकं त्याची दखल घेत नाहीत तोपर्यंत आपला दृष्टीकोण सातत्यानं समोर ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news