Virat Kohli on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर विराट कोहलीची भावूक पोस्ट; नानांचा 'तो' VIDEO पुन्हा होतोय व्हायरल

Virat Kohli on Nana Patekar: विराट कोहलीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
Virat Kohli on Nana Patekar
Virat Kohli on Nana PatekarPudhari
Published on: 
Updated on: 

Virat Kohli on Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर संपूर्ण देशातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनेही नाना पाटेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात निधन झाल्याचे वृत्त आहे.

विराट कोहलीने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर नाना पाटेकर यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली. “भारतीय सिनेमातील खरे दिग्गज. त्यांचे काम आणि त्यांचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत जिवंत राहील. नाना पाटेकर जी, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती,” अशा शब्दांत कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Virat Kohli on Nana Patekar
Nana Patekar News: नानांचा रात्री अडीच वाजता मित्राला मेसेज... 4.20 वाजता रुग्णालयात; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

विराटच्या या पोस्टनंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये नाना पाटेकर यांचा एक जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर यांनी विराट कोहलीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले होते.

नाना पाटेकर हे विराट कोहलीचे मोठे चाहते होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी विराट हा आपला आवडता क्रिकेटपटू असल्याचे सांगितले होते. विराट मैदानावर खेळत असताना त्याचा खेळ पाहण्याची आपली उत्सुकता किती असते, हेही त्यांनी मजेशीर पद्धतीने सांगितले होते.

Virat Kohli on Nana Patekar
Tukaram Mundhe on Nana Patekar: “लव्ह यू, बाळा…” नाना पाटेकरांचे ते शेवटचे शब्द; नानांच्या आठवणीने तुकाराम मुंढे भावूक

“विराट हा असा खेळाडू आहे, ज्याच्यावर माझं खूप प्रेम आहे. तो मला खूप आवडतो. विराट जर लवकर बाद झाला, तर मला जेवायचीही इच्छा होत नाही,” असे नाना पाटेकर यांनी त्या मुलाखतीत म्हटले होते.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अभिनेता आणि क्रिकेटपटू यांच्यातील हे नाते किती खास होते, याची आठवण चाहत्यांना या व्हिडीओमधून होत आहे.

विराट कोहलीने नानांना दिलेली श्रद्धांजली आणि त्यांचा विराटवरील असलेला जिव्हाळा यामुळे हा जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. नाना पाटेकर यांच्या अभिनयाची आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण चाहत्यांच्या मनात कायम राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news