Nana Patekar News: नानांचा रात्री अडीच वाजता मित्राला मेसेज... 4.20 वाजता रुग्णालयात; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, त्यांच्या अखेरच्या काही तासांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Nana Patekar Death News
Nana Patekar Death NewsPudhari
Published on: 
Updated on: 

Nana Patekar Death News: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी त्यांना अचानक गंभीर त्रास झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांच्या अखेरच्या काही तासांमध्ये नेमकं काय घडलं, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः रात्री उशिरापासून पहाटे रुग्णालयात दाखल होईपर्यंतचा घटनाक्रम महत्त्वाचा आहे.

गोव्यातील घरी प्रकृती बिघडली; मित्राला मेसेज केला

नाना पाटेकर गोव्यात होते. त्यांनी अडीच वाजता मित्राला मेसेज केलेला की मला बरं वाटत नाही. पण रात्रीची वेळ असल्याने मित्रानेही मेसेज बघितला नाही. पहाटे चारच्या सुमारास त्याने मेसेज बघितला. त्याने मेसेज बघितल्या बघितल्या नानांच्या केअर टेकरला फोन करून घरी पाठवलं. मणिपाल हॉस्पिटल घरापासून जवळ होतं. तो केअर टेकर मणिपालला ४.१८ ला गेला. ४.२० ला रुग्णवाहिका घरी पोहोचली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. ५.२० मिनिटांनी डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचं कन्फर्म केलं.

नाना पाटेकर यांच्या निधनाचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल. दरम्यान, नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून सर्व आवश्यक ती मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांची शर्थीची धडपड

रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्यावर जवळपास ४५ मिनिटे सातत्याने CPR करण्यात आले. मात्र या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. अखेर पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

मृत्यूचे कारण काय?

प्राथमिक माहितीनुसार नाना पाटेकर यांचा मृत्यू गंभीर कार्डियाक अरेस्टमुळे झाला. त्यांच्या गोव्यातील निवासस्थानीच त्यांना हा गंभीर त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मात्र त्यांच्या मृत्यूचे अंतिम वैद्यकीय कारण निश्चित करण्यासाठी पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकरणात मेडिको-लीगल केस म्हणजेच MLC नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे शवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर मृत्यूच्या वैद्यकीय कारणाबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होऊ शकते.

४५ मिनिटे CPR, तरीही जीव वाचवता आला नाही

कार्डियाक अरेस्टच्या परिस्थितीत रुग्णाला तातडीने CPR देणे अत्यंत महत्त्वाचे असते. नाना पाटेकर यांच्या बाबतीतही डॉक्टरांनी जवळपास ४५ मिनिटे सतत CPR देण्याचा प्रयत्न केला.

मात्र उपचारादरम्यान त्यांच्याकडून कोणताही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर डॉक्टरांनी पहाटे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समोर येणार

नाना पाटेकर यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण मेडिको-लीगल म्हणून नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे शवविच्छेदनाची प्रक्रिया केली जाणार आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूशी संबंधित वैद्यकीय बाबी अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या डॉक्टरांनी दिलेली प्राथमिक माहिती कार्डियाक अरेस्टची आहे. अंतिम वैद्यकीय निष्कर्षासाठी शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

Nana Patekar Death News
Nana Patekar: रांगड्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकणारा 'नटसम्राट'; रंगभूमीपासून बॉलिवूड गाजवणाऱ्या नानांचा थक्क करणारा प्रवास

भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठं नाव हरपलं

नाना पाटेकर हे केवळ अभिनेता नव्हते, तर त्यांच्या दमदार अभिनयशैलीमुळे त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

'परिंदा', 'क्रांतिवीर', 'प्रहार', 'तिरंगा', 'वेलकम' यांसारख्या हिंदी चित्रपटांपासून 'नटसम्राट'सारख्या मराठी चित्रपटापर्यंत त्यांनी अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या.

त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार, सहकारी आणि चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील एका प्रभावी कलाकाराचा प्रवास अशा प्रकारे संपल्याने चाहत्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Nana Patekar Death News
Nana Patekar Passed Away: 'नटसम्राट'ची अकाली एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

नाना पाटेकर यांच्या अखेरच्या तासांचा थोडक्यात घटनाक्रम

  • गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

  • नाना पाटेकरांनी रात्री अडीच वाजता मित्राला मेसेज केला.

  • त्यांना गंभीर कार्डियाक अरेस्ट आला होता.

  • केअर टेकरने त्यांना मणिपाल रुग्णालयात नेले.

  • रुग्णालयात डॉक्टरांनी जवळपास ४५ मिनिटे CPR करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

  • मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही.

  • पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

  • यानंतर मेडिको-लीगल केस नोंदवण्यात आली असून शवविच्छेदनाची प्रक्रिया केली जाणार आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक अत्यंत प्रभावी आणि वेगळ्या धाटणीचा अभिनेता गमावला आहे. त्यांच्या निधनामागील अंतिम वैद्यकीय कारण शवविच्छेदन अहवालानंतर अधिक स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news