Vikram Gokhale : विक्रम गोखले यांच्या शेवटच्या चित्रपटातील गाणं रिलीज

Vikram Gokhale
Vikram Gokhale

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी – हिंदी चित्रपटसह रंगभूमीवर आपल्या अभिनयाने चाहत्यांना खिळवून ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले ( Vikram Gokhale) यांनी जगाचा निरोप घेतलाय. विक्रम गोखले यांच्या स्मरणार्थ पॅनोरमा म्युझिक कंपनीने 'जगजीवन की पत्नी का तीसरा प्यार' या त्यांच्या शेवटच्या चित्रपटातलं पहिलं गाणं रिलीज केलं आहे.

'जगजीवन की पत्नी का तीसरा प्यार' या चित्रपटात विक्रम गोखले ( Vikram Gokhale) आणि रेवती हे दोघेही वृद्ध जोडप्याच्या भुमिकेत दिसणार आहेत. जिव्हाळ्याच्या नात्यात गुंफणारे हे एक वृद्ध जोडपं असून दोघांनीही खूप सुंदररित्या अभिनय साकारलं आहे. 'तु अब आया' हे या चित्रपटातलं रिलीज झालेलं पहिलं गाणं आहे. हे गाणं दिग्दर्शक राजेश बच्चन यांनी लिहलं आहे. प्रसिद्ध गायक अंबर दास यांनी हे गाणं गायलं आहे. तर संगीतकार संजॉय डॅज यांनी संगीतबद्ध केलं आहे.

या चित्रपटाची कथा विक्रम गोखले ( जगजीवन ) आणि रेवती (सुरू ) या वृद्ध जोडप्यांच्या आयुष्याभोवती फिरणारी आहे. हे जोडपे पाच दशकांपूर्वी एकमेकांपूर्वी लग्नबंधनात अडकले होते. आता ते डोंगरी भागात आनंदात जीवन जगत आहेत. परंतु सुरूचा स्मृतिभ्रंश त्यांच्या आनंदी जीवनाला ग्रहण लावते. आंनद हिरावून नेत आहे. पत्नी सुरु आनंदी राहावी, यासाठी जगजीवन यांचे प्रयत्‍न सुरु असतात.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news