Koffee With Karan Controversy : 'ट्रोलिंग' प्रकरणी विजय देवरकोंडा- रश्मिका मंदानाच्या मॅनेजरची 'सायबर क्राईम'मध्ये तक्रार

'कॉफी विथ करण'मधील सहभागानंतर सुरु झालेल्‍या ट्रोलिंगची घेतली गंभीर दखल
Koffee With Karan Controversy
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये सहभागी झाले होते. Pudhari
Published on: 
Updated on: 

Koffee With Karan Controversy : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांना सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्‍दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध अक्षेपार्ह मजकूर पसरवला जात असल्याचा आरोप करत त्यांच्या मॅनेजरने हैदराबाद सायबर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

फेक स्क्रीनशॉट आणि सायबर ट्रोलिंगविरोधात कठोर पाऊल

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा मॅनेजर पी. निशांत कुमार यांनी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. 'कॉफी विथ करण'च्या एपिसोडनंतर सोशल मीडियावर या जोडीला लक्ष्य करून चुकीचा मजकूर, छेडछाड केलेले (मॉर्फ्ड) स्क्रीनशॉट्स आणि फेक अकाऊंट्सद्वारे बदनामी केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी टीमने आवश्यक ते पुरावे आणि सोशल मीडिया लिंक्स पोलिसांकडे तपासासाठी सुपूर्द केल्या आहेत.

Koffee With Karan Controversy
Rashmika-Vijay wedding: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने दिली लग्नाची कबुली; या चित्रपटापासून सुरू झाली होती लव्ह स्टोरी

बेकायदेशीर ऑनलाईन गैरवर्तनाला चाप बसण्‍यासाठी तक्रार

या संदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात टीमने स्पष्ट केले की, "हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा रास्त टीकेवर गदा आणण्यासाठी घेतलेला नाही. मात्र, हेतूपुरस्सर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या अफवा आणि बेकायदेशीर ऑनलाईन गैरवर्तनाला चाप बसावा, म्हणूनच ही कायदेशीर पावले उचलण्यात आली आहेत." तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे. चुकीच्या गोष्टी पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही टीमने दिला आहे.

Koffee With Karan Controversy
Rashmika Mandanna: “मी साऊथची आहे...”; उच्चारावरून टीका करणाऱ्यांना रश्मिका मंदानाचे चोख उत्तर

ट्रोलिंग नक्की कशामुळे सुरू झाले?

'कॉफी विथ करण'मध्ये विजय आणि रश्मिकाने आपल्या नात्याविषयी मोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या. यादरम्यान रश्मिकाने विमानतळावर विजयला लग्नासाठी विचारल्याचा किस्सा सांगितला. त्यावर विजयने तिला "मला अजून १०० वेळा विचार" असे गंमतीत म्हटल्याचे आणि त्यानंतर रश्मिकाने वर्षभर त्याला विचारल्याचा खुलासा शोमध्ये झाला. एवढ्या मोठ्या निर्णयासाठी वेळ हवा होता, असे स्पष्टीकरण विजयने दिले असले, तरी काही नेटकऱ्यांनी यावरून विजयला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news