Rashmika Mandanna: “मी साऊथची आहे...”; उच्चारावरून टीका करणाऱ्यांना रश्मिका मंदानाचे चोख उत्तर

हिंदी चित्रपटांमधील आपल्या दक्षिण भारतीय उच्चारांमुळे सातत्याने होणाऱ्या ट्रॉलिंगवर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने उत्तर दिले आहे.
Rashmika Mandanna
Rashmika MandannaFile Photo
Published on: 
Updated on: 

Rashmika Mandanna

मुंबई: हिंदी चित्रपटांमधील आपल्या दक्षिण भारतीय उच्चारांमुळे सातत्याने होणाऱ्या ट्रॉलिंगवर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने उत्तर दिले आहे. "मी मूळची दक्षिण भारताची आहे, त्यामुळे माझ्या हिंदीत दाक्षिणात्य उच्चार असणे स्वाभाविक आहे. ट्रॉलिंग किंवा टीकेमुळे मी कधीही स्वतःवर मर्यादा आखून घेणार नाही," अशा शब्दांत तिने टीकाकारांना ठणकावून सांगितले. 'कॉफी विथ करण' या शोच्या नव्या पर्वात अभिनेता व तिचा पती विजय देवराकोंडा याच्यासोबत तिने हजेरी लावली होती. यावेळी तिने अभिनयप्रवास, विविध भाषांमधील काम आणि स्वतः डबिंग करण्याच्या निर्णयावर मनमोकळे भाष्य केले.

‘टीकेमुळे स्वतःच्या सीमा सीमित केल्या नाहीत’

कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच विविध कारणांवरून टीका सहन करावी लागल्याचे सांगत रश्मिका म्हणाली, "माझा अभिनय, माझी भाषा किंवा लहेजा, यांपैकी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून माझ्यावर टीका झाली आहे. परंतु, मला स्वतःला एकाच इंडस्ट्रीपुरते किंवा एकाच भाषेपुरते मर्यादित ठेवायचे नव्हते. मला सर्व भाषांमध्ये काम करायचे होते. म्हणूनच मी सुरुवातीपासूनच नवनवीन आव्हाने स्वीकारली." 'अ‍ॅनिमल' आणि 'द गर्लफ्रेंड' यांसारख्या पूर्णपणे वेगळ्या चित्रपटांमध्ये काम करताना एक कलाकार म्हणून खूप समाधान मिळाल्याचेही तिने म्हटले.

Rashmika Mandanna
Rashmika Mandanna |नॅशनल क्रशने पुन्हा जिंकलं मन, पीच कलर बॉडी फिट ड्रेसमध्ये कमालीचं सौंदर्य

हिंदी लहेजावरील टीकेवर स्पष्ट भूमिका

'थम्मा', 'कॉकटेल २', 'अ‍ॅनिमल', 'छावा' आणि 'सिकंदर' यांसारख्या हिंदी चित्रपटांतील संवादांवरून सोशल मीडियावर रश्मिकावर बरीच टीका झाली होती. याविषयी बोलताना ती म्हणाली, "माझ्या उच्चारांवर आक्षेप का घेतला जातो, हेच मला समजत नाही. मी दक्षिण भारतातून आले आहे, तर माझ्या बोलण्यात तो लहेजा असणारच. याउलट अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे."

‘दिग्दर्शकांचा माझ्या डबिंगवरच विश्वास’

आपल्या चित्रपटांचे डबिंग स्वतः करण्याबाबत बोलताना रश्मिका म्हणाली, "चित्रपटाच्या पात्रासाठी दुसऱ्या कोणाचा आवाज योग्य वाटत असेल, तर दुसऱ्या डबिंग आर्टिस्टचा वापर करण्यास माझी काहीच हरकत नसते. मी प्रत्येक दिग्दर्शकाला हा पर्याय देते. मात्र, आजवरच्या माझ्या एकाही दिग्दर्शकाने तो पर्याय स्वीकारला नाही. त्यांनी नेहमीच माझ्या स्वतःच्या आवाजात डबिंग करण्याला प्राधान्य दिले. वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वतः डबिंग करणे हे अत्यंत कष्टाचे काम आहे आणि ते मी करू शकते, याचा मला अभिमान आहे."

रश्मिकाचे आगामी बहुचर्चित प्रकल्प

रश्मिका नुकतीच होमी अदजानिया यांच्या ‘कॉकटेल २’ या चित्रपटात दिसली होती. तसेच विजय देवराकोंडासोबतचा तिचा ‘रणबाली’ हा चित्रपटही चर्चेत आहे. याशिवाय महिलाप्रधान अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपट ‘मैसा’ आणि दिग्दर्शक अ‍ॅटली यांचा अल्लू अर्जुनसोबतचा ‘राका’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Rashmika Mandanna
Rashmika Mandanna|रश्मिकाने शेअर केले 'क्युट' मोमेंट, तिच्यासोबत लाडका श्वानही देतोय फोटो पोझ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news