

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या बाळाबाबत सध्या सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. तीन महिन्यांनंतर पहिली झलक पाहायला मिळाली आहे. बाळाच्या नावाचा अर्थ समोर आल्याची चर्चा चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.
Vicky Kaushal Katrina Kaif first pictur of baby boy beautiful meaning
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली जोडी म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ. त्यांच्या लग्नानंतरही हे दोघे नेहमीच चर्चेत राहिले असून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सध्या सोशल मीडियावर विकी-कॅटच्या बाळाबाबत चर्चा सुरु आहे.
विकी आणि कॅटरिनाच्या बाळाची तीन महिन्यांनंतर पहिली झलक पाहायला मिळाली. दोघांनी चिमुकल्या हाताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या झलकेबरोबरच बाळाच्या नावाचाही उल्लेख होत असून त्या नावाचा अर्थ अतिशय सुंदर आहे.
कॅट-विकीचा मुलगा तीन महिन्यांचा झाला आहे. या कपलने मुलाची पहिली झलक शेअर केली आहे. या झलक सोबत त्यांनी नाव देखील जाहीर केले आहे. कॅटरीना - विकीने ज्वाईंट पोस्टमध्ये बाळाचे नाव विहान कौशल ठेवलं आहे. कॅटरीना - विकीने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांचे हात दिसत आहेत. त्यांनी आपल्या बाळाचा हात धरलेला दिसत आहे. या पोस्टवर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय.
कॅटरीना-विकीने फोटो शेअर करताना लिहिलं- Our Ray of Light. Vihaan Kaushal. विहान कौशल. Prayers are answered Life is beautiful. Our world is changed in a instant. Gratitude beyond words. सोबतच एव्हिल आयचा इमोजी शेअर केला आहे.” विहान (Vihaan) चा अर्थ सकाळ, नवा प्रारंभ असा होतो.
परिणीती चोप्राने कॉमेंट केलं आहे - ती नुकतीच स्वतः आई झाली आहे. तिने लिहिले, "छोटीशी मैत्रीण!" शिबानी अख्तर, मिलाप झवेरी, सोफी चौधरी अभिनंदन केले. कॅटरिनाने ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या बाळाला जन्म दिला होता.