

‘धुरंधर’ या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाच आहे. अवघ्या काही दिवसांत या चित्रपटाने केजीएफ २, पुष्पा २ आणि आरआरआरसारख्या मेगाहिट चित्रपटांनाही मागे टाकले आहे. दुसरीकडे, मोठ्या अपेक्षा असलेला ‘इक्कीस’ मात्र अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही आणि त्याची कमाई कासवगतीने सुरू आहे.
dhruandhar box office collection day 33
बॉलिवूडमध्ये सध्या नाव गाजतंय ते म्हणजे ‘धुरंधर’. चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः तुफान आणले आहे. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, हाऊसफुल्ल शो आणि सोशल मीडियावरील प्रचंड चर्चा यामुळे ‘धुरंधर’ने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. ट्रेड ॲनालिस्टच्या मते, ‘धुरंधर’ने पहिल्याच आठवड्यात जेवढी कमाई केली आहे, ती यापूर्वी केजीएफ २, पुष्पा २ आणि आरआरआरसारख्या मेगाहिट चित्रपटांनाही जमलेली नव्हती. दमदार कथा, भव्य अॅक्शन सीक्वेन्सेस, शानदार गाणी, पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय हे या यशामागचे प्रमुख कारण मानले जात आहे.
मध्य पूर्वेत बंदी असूनही, आदित्य धरचा 'धुरंधर' उत्तर अमेरिकेत चांगली कमाई करत आहे. 'धुरंधर' आतापर्यंतचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे. ओवरसीज कमाईमध्ये, मंगळवार ६ जानेवारीपर्यंत, देशांतर्गत ८१३.४० कोटी नेट कमाई केली होती. RRR ने ९१५.८५ कोटी रुपये कमावले होते.
वर्ल्डवाईड १२२२ कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. एस एस राजामौली यांच्या RRR ने २०२२ मध्ये १२३० कोटी कमावले होते. 'KGF: २' ने १२१५ कोटी रुपये कमावले होते. अल्लू अर्जुन पुष्पाने २७१ कोटी रुपयांचे कलेक्शन केलं होतं.
'धुरंधर' बॉक्स ऑफिस कलेक्शन
रिपोर्टनुसार, 'धुरंधर'ने ३२ व्या दिवशी ४.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केलं होतं. ३३ व्या दिवशी जवळपास ४.७५ कोटींचा गल्ला जमवला होता. आता एकूण कमाई ७८१.७५ कोटी रुपये झाले आहेत.
'धुरंधर'च्या यशानंतर आदित्य धर दर्शनाला
'धुरंधर'च्या यशानंतर दिग्दर्शक आदित्य धर पत्नी यामी गौतमसोबत बगलामुखी मंदिर दर्शन करण्यासाठी पोहोचले. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे मा बगलामुखी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. आदित्य धर - यामी गौतमने त्यांचा मंदिरातील फोटो इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. आदित्य आणि यामी दोघेही पिवळ्या रंगाची चुनरी परिधान केलेले दिसतात. आदित्य-यामीने कॅप्शनमध्ये लिहिलं - प्राचीन मंदिर माता श्री बगलामुखी देवी ट्रस्ट बनखंडी कांगडा हिमाचल प्रदेश.
इक्कीसची कमाई कासवगतीने
अगस्त्य नंदा, धर्मेंद्र, जयदीप अहलावत, सिकंदर खेर, सिमर भाटिया स्टारर इक्कीस चित्रपट १ जानेवारी रोजी रिलीज झाला आहे. त्यावेळी इक्कीसने ७ कोटी कमावत शानदार ओपनिंग केले होते. आता ६ व्या दिवशी १.५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतची एकूण कमाई २३ कोटी रुपये झाली आहे.