

ऐश्वर्या नारकरच्या माहेश्वरी साडीतील साध्या पण मोहक लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या अंदाजामुळे पुन्हा एकदा पारंपरिक हातमागाच्या साड्यांकडे लक्ष वेधलं गेलं आहे. खरी माहेश्वरी साडी ओळखण्यासाठी तिची काठ, हलकं वजन, रेशीम-कापसाचं मिश्रण आणि पारंपरिक डिझाइन महत्त्वाचं ठरतं.
ऐश्वर्या नारकरचे पुन्हा नवे फ्रेश साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत. तिने नेसलेली राणी पिंक कलर साडी माहेश्वरी आहे
ओरिजिनल माहेश्वरी साडी ओळखायची कशी, यासाठी खास ट्रिक्स आहेत. या साड्यांमध्ये नैसर्गिक आणि गडद रंगांचा वापर केला जातो, जसे की सोनेरी पिवळा, मोरपंखी निळा, गडद हिरवा आणि लाल.
म. प्र.तील महेश्वर शहरातील ही साडी रेशीम, कापसाच्या मिश्रणापासून विणली जाते, ज्यामुळे तिला एक वेगळा पोत मिळतो. हलके, मऊ आणि चमकदार कापडाचा पोत स्पर्श करून पाहावा. यावेळी हलके गुळगुळीत आणि किंचित कुरकुरीत वाटले पाहिजे.
अस्सल माहेश्वरी साड्या स्थापत्यकलेपासून प्रेरित आकृतिबंधांसाठी ओळखल्या जातात. चटई सारखे, चमेलीचे फूल, विटांसारखा, हिऱ्याच्या आकारासारखे आकृती असते.
माहेश्वरी साडीची बॉर्डर खूप गुंतागुंतीची जरीकामाने सजवलेली असते. पदर अनेक पट्टे किंवा भौमितिक डिझाईन केलेली असते. उन्हाळ्यासाठी उत्तम असतात, पण थंडीतही आरामदायक राहतात.
पल्लू किंवा शेवटच्या तुकड्यात पाच पट्टे असतात - तीन रंगीत आणि दोन पांढरे. ही साडीची खासियत आहे. सिल्क, कॉटन, सिल्क-कॉटन (Neem Silk), गडद रंगांच्या (Katan) आणि चेक डिझाइनच्या (Checks design) अशा विविध प्रकारांमध्ये या साड्या उपलब्ध आहेत.
या साड्या आजही हाताने विणल्या जातात (handloom) ज्यामुळे त्यांची गुणवत्ता आणि कलात्मकता टिकून आहे. माहेश्वरी रेशमी साडी हलकी असते. माहेश्वरी हातमाग साडी अस्सल आहे की नाही हे पाहण्यासाठी हातमाग चिन्ह तपासा. हे चिन्ह साडीमध्येच विणले जाते.