

सध्या अनेक ठिकाणी 'ज्युनियर कौन बनेगा करोडपती' या शोची जोरदार चर्चा आहे. याला कारण आहे 17 व्या सीझनमध्ये आलेला ईशीत भट. इयत्ता पाचवीतील ईशीत सध्या केबीसीतील त्याच्या वागण्यामुळे ट्रोल होतो आहे. ईशीतने अमिताभ यांना दिलेली उत्तरे काहीशी उद्धट वाटणारी होती. त्यावरून नेटीझन्सनी ईशीतला आणि त्याच्या आई वडिलांना ट्रोल केले गेले. पण आता काही पोस्टमध्ये ईशीतच्या बचाव करणाऱ्याही दिसत आहेत. अभिनेता वैभव मांगलेने सोशल मिडियावर पोस्ट करत ईशीतची बाजू घेतली आहे. (Latest Entertainment News)
आपल्या पोस्टमध्ये वैभव म्हणतात, 'केबीसीच्या प्रसिद्धीसाठी त्या मुलाचा वापर केला गेला असेल तर आपण एका भीषण वास्तवात आहोत. हकनाक त्या मुलाच्या भविष्याचा बळी दिला गेला.’
यावर नेटीझन्सनीही वैभव मांगले यांच्या पोस्टचे समर्थन करणारी कमेंट केली आहे.
एकजण कमेंटमध्ये म्हणतो, ‘सदरचा एपिसोड दाखविला नसता तरी चालले असते. त्यामुळे प्रसिद्धीसाठी आहे असे वाटते. तर दुसऱ्या व्यक्तिचेही असेच मत आहे. तो म्हणतो, ‘अगदी खरय सर बहुदा तो मुलगा ADHD( attention deficit hyperactive disorder) ने ग्रस्त असावा...I am a pediatric therapist treating children with special needs आणि काहीच न जाणता social media वर त्या मुलाला, आई वडिलांना troll करणारे स्वतः mentally sick आहेत.’
तर अनेकांनी मात्र त्यांच्या पोस्ट विरोधात कमेंट केली आहे. त्यापैकी एकजण म्हणतो, ‘ अजिबात नाही. चूक मुलाच्या पालकांचीच आहे.असे वर्तन एवढ्या पब्लिक समोर त्याने केले आहे ते खूप चुकीचे आहे. चुकून झालेले नाहीये. जाणीवपूर्वक केले आहे.’
या संवादादरम्यान बोलताना ईशीत अमिताभ याना म्हणतो, 'अरे सर तुमचे तोंड नाही उत्तर लॉक करा.’ केवळ त्याचा अॅटीट्यूडच नाही तर त्याचा टोनही अनेक प्रेक्षकांना अस्वस्थ करत होता. पुढे तो म्हणतो, ‘मला नियम वैगेरे काही सांगू नका, मला सगळे माहिती आहे.’ तसेच तो पुढे बिग बी यांना म्हणतो, 'बिग बी अंकल तुम्ही चुकताच की!’ अर्थात इतका अॅटीट्यूड दाखवणारा ईशीत काही खास रक्कम न जिंकताच शोमधून निघून गेला. यानंतर त्याला मोठ्याप्रमाणावर ट्रोल केले गेले.