

Actor Pankaj Dheer Passes Away
मुंबई : अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. ते बऱ्याच काळ कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांचे मित्र आणि सहकारी अमित बहल यांनी ही बातमी चाहत्यांशी शेयर केली आहे. त्यांचा कॅन्सर एक वेळ उपचारानंतर पुन्हा उलटून आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती बरी नसल्याचे समोर आले होते. याशिवाय त्यांच्यावर या दरम्यान मोठी शस्त्रक्रिया झाल्याचे समोर येत होते. (Latest Entertainment News)
CINTAA (Cine & TV Artistes Association) ने याबाबत पोस्ट शेयर केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, माजी सचिव श्री पंकज धीर यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जातील.
याशिवाय अर्जुनाच्या भूमिकेत दिसलेले अभिनेता फिरोज खान यांनीही पंकज यांच्या निधनाचे वृत्त शेयर केले आहे. पंकज आणि फिरोज यांची मालिकेपासून घट्ट मैत्री होती. आपल्या शोक संदेशात ते म्हणतात, ‘वैयक्तिकरित्या एका चांगल्या मित्राला मी गमावले आहे. ते खूपच चांगली व्यक्ति होते. मी अजूनही धक्क्यात आहे. पंकज यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये अभिनयाची छाप सोडली. पण बी आर चोप्रा यांच्या महाभारतमधील कर्णाची भूमिका विशेष गाजली. याशिवाय चंद्रकांता, द ग्रेट मराठा या शोचा देखील समावेश होता. याशिवाय बादशहा, सडक आणि सोल्जर या सिनेमातही त्यांनी काम केले होते.
पंकज यांच्या पश्चात मुलगा निकीतन आणि पत्नी अनीता आहे. त्यांच्या मुलगा निकीतन धीर हा अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. निकीतन हा चेन्नई एक्सप्रेस या सिनेमातून त्याची थांगबली ही व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय श्रीमद रामायण या मालिकेतील रावणाची व्यक्तिरेखाही गाजली होती.