
अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिने चाहत्यांशी खास बातमी शेयर केली आहे. समंथा नव्या घराची मालकीण बनली आहे. तिने सोशल मिडियावर या पूजेचे आणि नव्या घराचे फोटो शेयर केले आहेत.
या दरम्यान पारंपरिक वेशात समंथा पूजा करताना दिसली. यासोबतच तिने देवघराचा फोटोही शेयर केला आहे.
या घरच्या काही फोटोंमध्ये समंथाला घरातील अद्ययावत जीममध्ये वर्कआऊट करताना पाहू शकतो
यासोबतच तिने घरातील पाळीव प्राण्यांचा फोटोही शेयर केला आहे. तिच्या या फोटोंमुळे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर डिप्रेशन आणि ऑटो इम्यून त्रासापासून त्रस्त असलेली समंथा आता बऱ्यापैकी सावरली आहे
याशिवाय दिग्दर्शक राज नादीमोरू यांच्यासोबत नात्यात असल्याचेही तिच्या अनेक फोटोंवरून दिसून येते