

‘वध २’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा अधिकृत पोस्टर प्रदर्शित झाला असून त्यासोबतच काउंटडाऊन सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांची दमदार जोडी पुन्हा एकदा थरारक कथेत दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पोस्टरमधील गडद वातावरण पाहता चित्रपटात सस्पेन्स आणि भावनिक संघर्ष अधिक खोलवर मांडला जाण्याची शक्यता आहे.
Vadh 2 new poster released
‘वध २’ या चित्रपटाचा अधिकृत पोस्टर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या भागात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी साकारलेली पात्रे प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजली होती. साध्या दिसणाऱ्या कथेतून उलगडणारा गडद थरार, नैतिक संघर्ष आणि भावनिक तणाव यामुळे ‘वध’ला प्रचंड प्रशंसा मिळाली होती. आता ‘वध २’ मध्ये कोणती कहाणी पाहायला मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
नवीन पोस्टरमध्ये गडद रंगसंगती, गंभीर चेहरे आणि रहस्यमय वातावरण दिसून येते. यामुळेच ‘वध २’ची कथा नेमकी कोणत्या वळणावर जाणार, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी आता अवघा एक महिना उरला आहे. लव फिल्म्सने संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा दमदार नवा पोस्टर रिलीज केला आहे. हा चित्रपट ६ फेब्रुवारी, रोजी थिएटरमध्ये पाहता येणार आहे.
नव्या पोस्टरमध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता शांत, विचारमग्न दिसत आहेत. चेहर्यावरील गंभीर भाव पाहून वाटते की, कथा काहीतरी रहस्यमय असेल.
जसपाल सिंग संधू लिखित, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा स्पिरिच्युअल सिक्वेल २०२६ मधील चर्चित चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
वध २ बद्दल खास गोष्ट अशी की, ५६ व्या IFFI २०२५ मध्ये चित्रपटाचा गाला प्रीमियर हाउसफुल शोमध्ये झाला तेव्हा. स्क्रिनिंगनंतर उपस्थितांकडून दीर्घकाळ टाळ्यांचा कडकडाट झाला होता.