

जिया शंकर हिच्या मिस्ट्री मॅनसोबतच्या किस फोटोमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. अनेकांनी याला पब्लिसिटी स्टंट म्हटले, तर काहींनी तिच्यावर टीका केली. या सगळ्या आरोपांवर अखेर जियाने प्रतिक्रिया देत सत्य काय आहे ते स्पष्ट केले असून अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.
टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री जिया शंकर सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकताच सोशल मीडियावर तिचा एका मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. सोशल मीडियावर काही युजर्सनी हा फोटो जाणीवपूर्वक शेअर करून पब्लिसिटी स्टंट केल्याचे म्हटले होते. या संपूर्ण प्रकरणावर सुरुवातीला जियाने मौन बाळगले होते. मात्र वाढत्या टीका आणि अफवांमुळे अखेर तिच्या टीमेन यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जियाचा एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली होती. यावेळचा मिस्ट्री ऍनचा किस करतानाचा फोटोदेखील व्हायरल झाला होता. त्यानंतर अंदाज लावला गेला की, अखेर तो मिस्ट्री मॅन कोण आहे?
आता या सर्व चर्चांदरम्यान, जियाच्या टीमने प्रायव्हेसी जपण्याची विनंती केली. स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, ''सुरु असणाऱ्या अफवांना थांबाव्यात आणि आपले वैयक्तिक आयुष्याविषयी मर्यादा ठेवण्यासाठी.. ती पब्लिसिटी स्टंटमध्ये भाग घेत नाही.''
जियाच्या टीमने असे म्हटले आहे की, "जियाची टीम म्हणून आम्ही नेहमीच स्पष्ट आणि सातत्यपूर्ण भूमिका ठेवली आहे. ती प्रसिद्धी स्टंट किंवा बनावट कथांमध्ये सहभागी होत नाही. आणि हे तिने एकापेक्षा जास्त वेळा स्पष्ट केले आहे. कारण आमचा एकमेव हेतू अफवा आणि ट्रोलिंग शांत करणे हा होता, अनावश्यक वादविवाद निर्माण करणे नाही. एक आत्मविश्वासू कलाकार जिया जिचे काम स्वतःसाठी बोलते, जियाने कधीही प्रसिद्धी मिळवण्यासाठी वादाचा आधार घेतला नाही..."
ऑनलाईन अफवा तेव्हा पसरल्या जेव्हा जिया शंकर आणि अभिषेक मल्हान यांच्या साखरपुड्याची चर्चा होऊ लालगली. या दोघांनी यापूर्वी बिग बॉस ओटीटी २ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता आणि एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसले होते. पण जियाने स्पष्ट केले की, अभिषेक फक्त मित्र आहे.
जिया शंकर करण धनकला करत आहे डेट?
दरम्यान, जिया शंकर रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटलं जात आहे. त्या मिस्ट्री मॅनचा अमेरिकेत बिझनेस असल्याचं म्हटलं जातं. तिने एक पोटो षेअर केला होता, ज्यामध्ये रस्त्यांवरून हातात हात घालून चालताना, "दिल तू जान तू" गाताना आणि तिच्या जोडीदारावर रेड हार्ट इमोजी लावलेला व्हिडिओ पोस्ट केला होता. पण, मिस्ट्री मॅनचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.
रिपोर्टनुसार, तो मिस्ट्री मॅन करण धनक असल्याचे म्हटले जात आहे. पण जिया करणला डेट करत असल्याची पुष्टी झालेली नाही.
जिया हिंदी टीव्ही मालिकांमध्ये दिसली होती. पुढे तिने अनेक शोज आणि वेब सीरीजमध्ये काम केले. ती मराठी चित्रपटातही दिसली होती.
तिने आपल्या करिअरची सुरुवात २०१३ मध्ये तेलुगुपट एंथा अंदंगा उन्नावेतून केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये तिने कनवु वरियमच्या माध्यमातून तमिळ सिनेमामध्ये पाऊल ठेवले होते.