

थलपती विजयच्या Jana Nayagan चित्रपटातील ‘रावण मावंडा’ हे गाणे रिलीज होताच यूट्यूब आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये पोहोचले आहे. दमदार शब्द, प्रभावी संगीत आणि विजयची करिष्माई उपस्थिती यामुळे गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट विजयचा शेवटचा चित्रपट असू शकतो, अशा चर्चांमुळे चाहत्यांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.
Thalapathy Vijay trending song from Jana Nayagan film
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांच्या आगामी Jana Nayagan चित्रपटातील ‘रावण मावंडा’ हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
दक्षिणेचा सुपरस्टार thalapathy vijay ने अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली आहे. जननायकन हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे. ९ जानेवारी रोजी थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजयचा सामना बॉबी देओलशी होणार आहे, बॉबी या चित्रपट खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे.
थलापती विजय आणि बॉबी देओल यांचा 'Jana Nayagan' हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. ज्याला तुफान प्रतिसाद सिनेरसिकांकडून मिळाला आहे. त्यानंतर, निर्मात्यांनी चित्रपटाचे Ravana Mavanda हे गाणे देखील रिलीज केले, ज्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हे गाणे रिलीज होताच यु-ट्यूबवर ट्रेंडिंग गाणे बनले आहे.
रावण मावंडा गाण्याला अवघ्या तीन दिवसांत ५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रिपोर्टनुसार, दुसऱ्या क्रमांकावर हे गाणे ट्रेंड करत आहे. या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
बॉर्डर २ मधील गाण्याची चलती
परंतु, दुसरीकडे Border 2 मधील "घर कब आओगे" या गाण्याला मागे टाकू शकलेले नाही. घर कब आओगे अजूनही पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या गाण्याला ३ दिवसांत ३३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
Jana Nayagan हा चित्रपट विजयचा शेवटचा चित्रपट आहेत. विजय राजकारणात सक्रिय होणार असल्यामुळे हा चित्रपट त्याचा सिनेसृष्टीतील अखेरचा चित्रपट आहे. या चित्रपटात पूजा हेगडेचीही मुख्य भूमिका आहे.