‘गेमाडपंथी’च्या गोंधळात लागणार भल्याभल्यांची वाट, ट्रेलर प्रदर्शित

gemadpanthi web series
gemadpanthi web series

पुढारी ऑनलाईन डेस्क : एक सॉलिड प्लॅन.. एक सरळ साधा मुलगा… आणि एक हनी ट्रॅप. संतोष कोल्हे दिग्दर्शित 'गेमाडपंथी'चे उत्सुकता वाढवणारे ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. आता या हनी ट्रॅपमध्ये कोण कोण अडकणार, हे २ जूनपासून दर शुक्रवारी प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर समजणार आहे. दि फिल्म क्लिक स्टुडिओजने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. यात चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ट्रेलरमध्ये चिकूच्या किडनॅपिंगचा प्लॅन बनताना दिसत आहे. आता हा चिकू कोण? आणि त्याला का किडनॅप करत आहेत. याशिवाय हनीच्या लिपस्टिक लावण्यामागचं नेमकं रहस्य? या सगळ्याचीच आता लवकरच उत्तरं मिळतील. या सगळ्या गोंधळात भल्याभल्यांची वाट लागणार असून एकापेक्षा एक मोठे गेमही होणार आहेत. यात कोण कोणावर भारी होणार, हे 'गेमाडपंथी' पाहिल्यावरच कळेल. बोल्डनेसने भरलेली ही वेबसीरिज कॉमेडी, थ्रिलर आणि रहस्यमयही आहे.

दिग्दर्शक संतोष कोल्हे म्हणतात, "टिझर पाहून अनेकांनी मला फोन, मेसेज केले. काय आहे नक्की 'गेमाडपंथी'? यातील विविध पात्रं एकमेकांचा गेम करत असतानाच स्वतःच एखाद्या गेमचे शिकार बनत आहेत. आता हे गेम कसे होत आहेत आणि 'गेमाडपंथी' नक्की काय आहे, हे प्रेक्षकांना वेबसीरिज पाहताना कळेलच. यात अनेक दर्जेदार कलाकार आहेत."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news