Sonu Sood : सोनू सूद बिहारमध्ये वंचित मुलांसाठी “इंटरनॅशनल स्कूल” उभारणार | पुढारी

Sonu Sood : सोनू सूद बिहारमध्ये वंचित मुलांसाठी "इंटरनॅशनल स्कूल" उभारणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सोनू सूड नुकताच कटिहारमधील अभियंताला भेटला. येथे तो अभियंता आपली नोकरी सोडून अनाथ मुलांसाठी शाळा सुरू करतोय. (Sonu Sood) त्याने शाळेचे नाव ‘सोनू सूद’ ठेवले आहे. आता अभिनेता सोनू सूद या नवीन इमारतीचा उपयोग आणि वंचित मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी करणार आहे. (Sonu Sood)

फेब्रुवारीमध्ये सोनू सूदने २७ वर्षीय बिहार अभियंता बिरेंद्र कुमार महातो हा तरुण अनाथ मुलांसाठी शाळा उघडण्यासाठी आपली पूर्णवेळ नोकरी सोडतो हे वाचून तो आश्चर्यचकित झाला. या तरुणाने या शाळेचं नाव सोनू सूद ठेवल्याचे समजले. ११० मुलांना मोफत शिक्षण आणि त्यांना जेवण देण्याचे कार्य महतो करतो. यानंतर सोनूने महतो आणि शाळेतील मुलांची भेट घेतली.

शाळेतील मुलांच्या गरजा समजून घेण्यासाठी या अभिनेत्याने महतोसोबत खास वेळ घालवला. रेशनपासून ते दर्जेदार शिक्षणापर्यंत समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी सोनू प्रयत्न करणार आहे. सोनू सूदने या शाळेसाठी नवीन इमारतीचे काम सुरू केले आहे. जेणेकरून अनेक वंचित मुलांना येथे राहता येईल आणि शाळेत प्रत्येक मुलासाठी जेवण उपलब्ध होईल.

Back to top button