‘जॅंगो जेडी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का? (Video)

जॅंगो जेडी चित्रपट
जॅंगो जेडी चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लगान', 'दिल चाहता है', 'सरकार', 'कंपनी' आणि 'साथिया' सारख्या हिट सिनेमांसाठी स्टील फोटोग्राफी केलेले बॉलीवूडचे प्रसिद्ध स्टील फोटोग्राफर हरदीप सचदेव आता मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. जॅंगो जेडी असं त्यांच्या हा पहिल्या चित्रपटाचे नाव आहे. फिल्म मिल प्रा. लि. प्रॉडक्शन्स या बॅनरखाली रोहित भागवत आणि हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीय. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला.

एका छोट्या गावातून मुंबईत येऊन आपले नशीब आजमवणाऱ्या तरुणाची ही गोष्ट आहे. स्वप्न, आकांक्षा आणि ध्येय यांच्या जोरावर जानकीदास बाळकृष्ण धुरंदर अर्थात जेडी आपल्या संघर्षाला सुरुवात करतो. इथे आल्यावर त्याचा सामना शहरातल्या सगळ्या गोष्टींसोबत होतो. जेडीची भूमिका अभिनव सावंत याने साकारली असून त्याच्या नायिकेच्या भूमिकेत गौरी नलावडे आहे. या दोघांच्या सोबत आदित्य आंब्रे, योगेश सोमण, डॉ. निखिल राजेशिर्के, वरुण पनवार कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

नव्या दमाचा, नव्या पिढीचा असा हा नवा चित्रपट आहे. यशाचा मार्ग तुमच्यातल्या नायकात दडलेला आहे आणि जेव्हा परिस्थिति कठीण असते तेव्हा स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे चालले पाहिजे असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. २६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news