Ram Charan welcome Twins | चिरंजीवीचा आनंद गगनात मावेना; राम चरण दुसऱ्यांदा झाला पिता, पत्नी उपासनाच्या पोटी जुळ्यांचा जन्म

Ram Charan welcome Twins | चिरंजीवीचा आनंद गगनात मावेना; राम चरण दुसऱ्यांदा झाला पिता, पत्नी उपासनाच्या पोटी जुळ्यांचा जन्म
Ram Charan -upasana
Ram Charan welcome Twins instagram
Published on
Updated on
Summary

टॉलीवूड अभिनेता राम चरण दुसऱ्यांदा पिता झाला असून, पत्नी उपासनाच्या पोटी जुळ्यांचा जन्म झाला आहे. या डबल गुडन्यूजमुळे मेगास्टार चिरंजीवी यांचा आनंद गगनात मावत नसून, संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Ram Charan upasana welcome Twins

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार राम चरणच्या जुळ्यांचा जन्म झाला आहे. त्याची पत्नी उपासना कामिनेनीने दुसऱ्यांदा दोन्ही बा‍ळांना जन्म दिलाय. राम चरणला आता तीन मुले झाली आहे. अभिनेता चिरंजीवी पुन्हा आजोबा झाल्यानंतर त्यांनी एक सोशल मीडिया पोस्ट लिहिलीय.

एक मुलगा - एक मुलीचा जन्म

राम चरण-उपासना आधी एक मुलगी आहे. आता तिने एक मुलगा आणि एक मुलीला जन्म दिलाय. दोघांनी जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे. आता फॅन्स आणि त्याच्या मित्र परिवाराकडून राम - उपासनाला शुभेच्छा मिळत आहेत.

Ram Charan -upasana
Mardaani 3 Box Office Collection : दुसऱ्या दिवशी 'मर्दानी'च्या कमाईत घसरण, बॉर्डर २ ने पछाडले

चिरंजीवीने सोशल मीडिया व्यक्त केला आनंद?

राम-उपासना जुऊ्या मुलांचे आई-वडिल बनले आहेत. या कपलने शनिवारी आपल्या परिवारासोबत नव्या सदस्यांचे स्वागत केले. त्यांनी लिहिलं-"आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणासह, आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की राम चरण आणि उपासना यांना जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला आहे - एक मुलगा आणि एक मुलगी. बाळे आणि आई दोघेही निरोगी आहेत. या लहान मुलांचे आमच्या कुटुंबात स्वागत करणे हा आजी-आजोबा म्हणून आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि दैवी आशीर्वादाचा क्षण आहे. चिरंजीवी आणि सुरेखा या सर्वांच्या प्रार्थना, प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी आम्ही मनापासून आभारी आहोत."

राम चरण - उपासनाचा विवाह

राम चरण उपासनाचे लग्न जून २०१२ मध्ये झाले होते. त्यांचा साखरपुडा डिसेंबर २०११ मध्ये झाला होता. दिवाळी २०२५ च्या दरम्यान, उपासनाने सोशल मीडियावर आपल्या सीमंथम (बेबी शॉवर) चा एक व्हिडिओ पोस्ट केला होता.

Ram Charan -upasana
Amitabh Bachchan neighbour Nirmit Jesrani | 'असं नशीब कुणाचं?' अमिताभ बच्चन यांच्या शेजाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news