

अमिताभ बच्चन यांच्या शेजारी राहणाऱ्या निर्मित जेसरानी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ‘लकी शेजारी’ असं म्हणत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या असून, या व्हिडिओमुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.
Nirmit Jesrani video viral with Amitabh Bachchan
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुण कॅमेराबद्ध झाला. जो इंटरनेटवर व्हायरल झाला. खरंतर रविवारी मुंबईतील जुहू रोडवर जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली. बिग बींची एक झलक पाहण्यासाठी असंख्य चाहते त्यांच्या बंगल्याबाहेर रविवारी किंवा वाढदिवसादिवशी गर्दी करतात. यावेळी अमिताभ बाहेर येऊन आपल्या चाहत्यांना हात उंचावून अभिवादन करतात. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये एक तरुण कॅमेरात स्पॉट झाला. ते पाहून नेटकरी त्याला लकी शेजारी अशा टॅग देताहेत.
दुसरीकडे, तो तरुण कोण आहे, याची माहिती समोर आलीय. त्या तरुणाचे नाव निर्मित जेसरानी आहे. तो एक डिजिटल क्रिएटर आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होताच निर्मित जेसरानीने एक सेल्फ व्हिडिओ केला, ज्यामध्ये त्याने आपण अमिताभ बच्चन यांचे शेजारी असल्याचे म्हटले आहे. त्याने एक नोटदेखील लिहिली, ज्यामध्ये त्याने कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
निर्मितने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलंय?
''नमस्कार अमिताभ बच्चन सर, मी तुमचा शेजारी आहे - माझे नाव निर्मित जेसरानी आहे. दर रविवारी, तुमच्या चाहत्यांना अभिवादन केल्यानंतर, तुम्ही आमच्याकडे पाहून जो हात हलवता, त्यातून तुम्ही कसे व्यक्ती आहात हे खूप काही कळते. अशा नम्रतेचे जवळून साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खरोखर कृतज्ञ आहे, आणि शक्य झाल्यास मला तुम्हाला भेटायला आवडेल. प्रत्येक अर्थाने एक खरे दिग्गज.''
निर्मितने इंटरनेटवर व्हायरल झालेला व्हिडिओ त्याच्या अकाऊंटवर अपलोड केला आहे. या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्याला लकी शेजारी असे म्हटले आहे.
अमिताभ बच्चन यांच्या घराजवळ राहणं म्हणजे रोजच एखादा खास क्षण अनुभवायला मिळणं, असं अनेक चाहत्यांचं मत आहे. बिग बी अनेकदा चाहत्यांना हात हलवून अभिवादन करताना दिसतात.