Mardaani 3 Box Office Collection : दुसऱ्या दिवशी 'मर्दानी'च्या कमाईत घसरण, बॉर्डर २ ने पछाडले

Mardaani 3 Box Office Collection : दुसऱ्या दिवशी 'मर्दानी'च्या कमाईत घसरण, बॉर्डर २ ने पछाडले
Mardaani 3 poster
Mardaani 3 Box Office Collectionx account
Published on
Updated on
Summary

राणी मुखर्जी अभिनित ‘मर्दानी 3’ने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली असली, तरी दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या उत्पन्नात घसरण झाल्याचं चित्र आहे. याच काळात प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर 2’ने जोरदार कमाई करत मर्दानी 3 ला बॉक्स ऑफिसवर पिछाडीवर टाकलं आहे.

Mardaani 3 Box Office Collection latest updates

राणी मुखर्जी स्टारर 'मर्दानी ३' ची जितकी चर्चा होत आहे, त्या तुलनेत हा चित्रपट रिलीजच्या सुरुवातीलच म्हणावा तितका चालत नाहीये. रिलीज झाल्यानंतर ओपनिंग डेची साधारण सुरुवात झाली तरी दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे कमाईचे आकडे घसरले आहेत. बॉक्स ऑफिसवर म्हणावे तसे येश मिळाले नाही, आकडे काय सांगतात पाहुया.

Mardaani 3 poster
Bollywood Celebs Temple Visit | अनन्या पांडे ते भूमी पेडणेकर...भक्तीत तल्लीन झाले सेलेब्स

राणी मुखर्जी स्टारर 'मर्दानी ३' शुक्रवार ३० जानेवारी रोजी थिएटर्समध्ये रिलीज झाला. अभिराज मीनावाला दिग्दर्शित आणि यश राज फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपात जानकी बोदीवाला आणि मल्लिका प्रसाद यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. मर्दानी आणि मर्दानी २ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार परफॉर्मन्स केला होता. पण तिसऱ्या फ्रेंचायझीचे अपेक्षेपेक्षी कमी कलेक्शन झाले आहे. दुसऱ्या दिवशी जवळपास ६ कोटींची कमाई केलीय.

अ‍ॅक्शन, सामाजिक विषय आणि राणी मुखर्जीची दमदार भूमिका असूनही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात चित्रपट कमी पडला आहे. दरम्यान, दुसरीकडे, ‘बॉर्डर २’ ने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली आहे. देशभक्ती, भव्य अ‍ॅक्शन आणि मजबूत स्टारकास्टमुळे बॉर्डर २ ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने मर्दानी ३ ला कमाईत मागे टाकले आहे. बॉर्डर-२ ने ३१ जानेवारीला १७.७५ कोटींची कमाई केलीय. पहिल्या दिवशी मर्दानी-३ ने ४ कोटी, दुसऱ्या दिवशी ६ कोटी असे भारतात एकूण १० कोटीपर्य़ंत आकडा पोहोचला आहे. रिपोर्टनुसर, ६० कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला आहे. विकेंडचा रविवार फायदेशीर ठरेल, असा अंदाज लावला जात आहे.

Mardaani 3 poster
Cocktail 2 |‘कॉकटेल-२’वर मोठी बातमी! दिग्दर्शकाच्या अपडेटनंतर शाहिद-रश्मिका-क्रिती सेनॉनचा जल्लोष

मर्दानीचे दोन्ही फ्रेंचायझी चित्रपट ठरले होते हिट

मूळचा चित्रपट 'मर्दानी'ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी ४.७० कोटी कमावले होते. भारतातील नेट कलेक्शन ३५.६५ कोटी आणि ग्रॉस कलेक्शन ४८.११ कोटी होते. वर्ल्डवाईड कमाई ५९.३० कोटी रुपये आणि ओवरसीज ११.१९ कोटी रुपये होते. प्रदीप सरकार दिग्दर्शित चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

'मर्दानी २' डिसेंबर, २०१९ मध्ये रिलीज झाल होता. 'मर्दानी २' देखील हिट ठरला होता. भारतातील नेट कलेक्शन ५७ कोटी आणि ग्रॉस कलेक्शन ४७.३५ कोटी बोते. ग्लोबल कमाई ६७ कोटी होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news