सुबोध भावे-शिवानी सोनार यांच्या अभिनयाने Tu Bhetashi Navyane मालिका रंजक वळणावर

'तू भेटशी नव्याने' मालिका रंजक वळणावर
Tu Bhetashi Navyane
सुबोध भावे-शिवानी सोनार यांची फ्रेश जोडी नव्या मालिकेत दिसत आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या माध्यमातून पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची फ्रेश जोडी आणि प्रेमाचा विषय आगळ्यावेगळ्या पद्धतीनं मांडल्यामुळे ही मालिका प्रेक्षक पसंतीस उतरली आहे. ‘उत्तम कथा’, ‘माही आणि अभिमन्यू यांचा संवाद लाजवाब’,‘आम्हांला खूप आवडते ही मालिका’, ‘उत्तम अभिनयाने नटलेली ही मालिका पाहण्याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय’. ‘एआयचा उत्तम वापर असलेली सर्वोत्कृष्ट मालिका’ अशा अनेक चांगल्या प्रतिकिया प्रेक्षकांकडून येतायेत.

Tu Bhetashi Navyane
Nikki Tamboli ने Bigg Boss Marathi 5 मध्ये दाखवल्या दिलखेच अदा (Video)

'तू भेटशी नव्याने' या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत असून मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रिया मराठे आणि किशोरी आंबिये यांच्यामुळे मालिकेत सध्या रंजक वळण आलं आहे. त्यामुळे येत्या भागांमध्ये भरपूर नाट्य घडणार असून प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे यात शंका नाही.

Tu Bhetashi Navyane
KD The Devil First Look : Sanjay Dutt ला पाहून येईल 'खलनायक'ची आठवण

आयुष्यात पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतील वेगळ्या शैलीत दिसत आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते संदीप जाधव आहेत. सोमवार ते शुक्रवार रात्री ९.००वा. ही मालिका पाहता येईल.

Tu Bhetashi Navyane
Bigg Boss Marathi 5 : पोल खोलायला आला घनश्याम दराडे, बिग बॉस मराठी ५ मध्ये एन्ट्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news