Nikki Tamboli ने Bigg Boss Marathi 5 मध्ये दाखवल्या दिलखेच अदा (Video)

BB Marathi 5 दिलखेच अदा दाखवत निक्की तंबोलीने केले घायाळ
Bigg Boss Marathi 5
निक्की तंबोली बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये स्पधर्धक म्हणून दिसत आहेcolours Marathi Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये अभिनेत्री निक्की तंबोलीने एन्ट्री घेतली आहे. याआधी निक्की तंबोली बिग बॉस १४ मध्ये दिसली होती. आता ती बिग बॉस मराठी पाचव्या सीझनमध्ये दिसतेय. आपल्या हॉट अदांनी तिने सर्वांना घायाळ केलं आहे. (Nikki Tamboli) बिग बॉस प्रोमो व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये निक्की आपल्या अदा दाखवत आहे.

Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5 : पोल खोलायला आला घनश्याम दराडे, बिग बॉस मराठी ५ मध्ये एन्ट्री

बिग बॉस ओटीटी ३ संपायच्या मार्गावर आहे. बिग बॉस मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आला आहे. वर्षा उसगावकर, निखिल दामले, अंकिता प्रभु वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किलेकर, योगिता चव्हाण, अभिजित सावंत, घनश्याम दरोडे, इरीना रुदाकोवा, वैभव चव्हाण, रॅपर आर्या जाधव, गायक, कवी पुरुषोत्तम दादा पाटील, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अरबाज पटेल, सोशल मीडिया रिल्स स्टार धनंजय पोवार, व्लॉगर सूरज चव्हाण हे स्पर्धक बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 5
Dharmaveer- 2 : धर्मवीर-2 चित्रपटाची रिलीजची तारीख बदलली, पहा निर्माते काय म्हणाले...

कोण आहे निक्की तंबोली?

निक्की तंबोली चित्रपट अभिनेत्री आहे. ती छत्रपती संभाजीनगरची राहणारी असून तिने मॉडलिंगमधून करिअरची सुरुवात केली होती. पुढे तिने २०१९ मध्ये तेलुगु हॉरर-कॉमेडी, चिकाती गदिलो चिथाकोटुडु मधून करिअरची सुरुवात केली होती. निक्की कंचना ३ आणि थिप्पारा मीसम सारख्या चिपटांमध्ये पाहण्यात आलं आहे. बोल्ड फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत राहते.

Bigg Boss Marathi 5
Phir Aayi Hasseen Dillruba Trailer: फिर आई हसीन दिलरुबामध्ये गुंतागुंतीचा ठरणार प्रेमाचा खेळ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news