पुढारी ऑनलाईन
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज तृप्ती देसाई यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. त्या निमित्ताने त्यांनी एक आयुष्यावर भाष्य करणारी सुंदर कविता घरच्या सदस्यांना ऐकवली. आयुष्यं हे विधात्याच्या वहीतलं पानं असतं…अशा कवितेच्या ओळी तृप्ती देसाई ऐकवणार आहेत.
रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पानं मृत्यू तर पहिलं पानं जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची असतात कारण आपलंच ते कर्म असतं…. चुका जरी झाल्या तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातुनचं आपल्याला पुढे शिकायचं असतं. एकटे आलो म्हणून काय झालं सर्वांच होऊन जायचं असतं… इतकी समर्पक कविता सांगितल्यावर घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले. घरामध्ये काय झाले बघूया आजच्या भागामध्ये. पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.
हेही वाचलं का?