Toxic Tabaahi Song : यश-कियाराच्या चित्रपटाचे पहिले गाणे 'तबाही' रिलीज, पण चाहते का झालेत नाराज?

Toxic Tabaahi Song : यश-कियाराच्या चित्रपटाचे पहिले गाणे 'तबाही' रिलीज, पण चाहते का झालेत नाराज?
yash-kiara
Toxic Tabaahi Song out now instagram
Published on
Updated on
Summary

यश आणि कियारा आडवाणीची आगामी फिल्म टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स या चित्रपटाचं पहिले गाणं तबाही आज रिलीज झालं. या गाण्यावर चाहत्यांची मोठी अपेक्षा होती, पण व्हिडिओ न देऊन फक्त ऑडिओ रिलीज झाल्यामुळे अनेक फॅन्स नाराज झाले आहेत

Toxic Tabaahi Song released

टॉक्सिक द फेयरीटेल फॉर ग्रोनअप्स १९ मार्चला रिलीज होणार आहे. त्याआधी या चित्रपटातील तबाही गाणे रिलीज करण्यात आले आहे. यश स्टारर या चित्रपटाची टक्कर रणवीर सिंहच्या धुरंधर-२ शी होणार आहे. २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट धुरंधर हा सीक्वल असणार आहे. पण सध्या चर्चा आहे ती टॉक्सिकची. यामध्ये साऊथ स्टार यश, कियारा आडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया, रुक्मणि वसंत यांच्या भूमिका आहेत.

yash-kiara
Vijay Brother Anand Deverakonda | विजयच्या भावाने रश्मिकाचे असे केले स्वागत, तो नेमकं करतो तरी काय? कशी आहे सख्ख्या भावाशी बॉन्डिंग?

निर्मात्यांनी टॉक्सिकचे पहिले गाणे तबाही रिलीज केले आहे. निर्मात्यांनी कियारा आडवाणी आणि यशचे पोस्टर शेअर केले होते. ज्याची चर्चा खूप झाली होती. पण, निर्मात्यांनी यश स्टारर चित्रपटाचा पहिला ट्रॅक म्युझिक व्हिडिओशिवाय रिलीज केला आहे. त्यामुळे फॅन्स निराश झाले आहेत. 'टॉक्सिक: अ फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स'च्या निर्मात्यांनी अनेक भाषांमध्ये पहिले 'तबाही' गाणे रिलीज केले आहे. निर्मात्यांनी संगीत व्हिडिओशिवाय गाणे रिलीज केल्यामुळे चाहते म्हणताहेत की, आता व्हिडिओ देखील रिलीज करा.

हे गाणे विशाल मिश्राने तयार केले आहे. माहितीनुसार, प्रत्येक भाषेसाठी वेगवेगळे गीत लिहिले गेले आहेत. हिंदीसाठी राज शेखर, कन्नडसाठी योगराज भट, तेलुगूसाठी रामजोगय्या शास्त्री, तमिळसाठी विघ्नेश शिवन आणि मल्याळमसाठी रफीक अहमद. 'टॉक्सिक'ला कन्नड आणि इंग्लिशमध्ये एकत्र शूट करण्यात आलं आहे.

yash-kiara
Tom Holland-Zenday secret marriage | टॉम हॉलेंड-अभिनेत्री झेंडायाने आधीच लग्न केलंय का? 'स्पायडर मॅन' कपलच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

टॉक्सिक'चे टीझर आणि ट्रेलर

या महिन्यात चित्रपट रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी दोन टीझर रिलीज केले होते. पहिल्या टीझरमध्ये चित्रपटात होणारा रक्तपात दाखवण्यात आला होता, तर दुसऱ्या टीझरमध्ये यशच्या दाढी नसलेल्या अवताराची झलक दाखवण्यात आली होती.

दरम्यान, रिपोर्टनुसार, निर्माते ८ मार्च रोजी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहेत. या चित्रपटात नादियाच्या भूमिकेत कियारा अडवाणी, गंगा म्हणून नयनतारा, एलिझाबेथच्या भूमिकेत हुमा कुरेशी, रेबेकाच्या भूमिकेत तारा सुतारिया, मेलिसाच्या भूमिकेत रुक्मिणी वसंत, टोविनो थॉमस, अक्षय ओबेरॉय, साल्वाडोरच्या भूमिकेत डॅरेल डिसिल्वा आणि कर्माडीच्या भूमिकेत सुदेव नायर आहेत.

'केजीएफ: चॅप्टर २' नंतर चार वर्षांनी साटर यश मोठ्या पडद्यावर परतणार आहे. तो या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news