

Spider-Man: Brand New Day Tom Holland injured
मुंबई : हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता टॉम हॉलंड याने आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विशेषतः स्पायडर-मॅन या सुपरहिरोच्या भूमिकेत तो चाहत्यांचा लाडका ठरला आहे. मात्र, माहितीनुसार टॉम हॉलंडला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातामुळे मार्व्हलच्या पुढील चित्रपटाची म्हणजेच स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डेची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. टॉम जखमी झाल्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाचे शूटिंग मध्येच थांबवावे लागले आहे.
स्पायडर-मॅन ब्रँड न्यू डे ची शूटिंग ग्लासगो मध्ये सुरु होती. त्याला दुखापत झाल्यानंतर लगेच रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला काही आठवडे पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार आहे. काही दिलसांनंतर पुन्हा शूटिंग सुरू केले जाणार असल्याची माहिती मिळतेय. याआधीही टॉम हॉलंड अनेक चित्रपटांच्या शूटिंगवेळी जखमी झाला होता.
स्पायडर-मॅन ब्रँड न्यू डे ३१ जुलै, २०२६ रोजी रिलीज होणार होता. स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे हा मार्वल कॉमिक्स पात्र स्पायडर-मॅनवर आधारित एक आगामी अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे. 'स्पाइडर-मॅन: नो वे होम' २०२१मध्ये रिलीज झाला होता. स्पायडर-मॅन सीरीजच्या मागील चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवले होते. त्यामुळे या नव्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे, ब्रँड न्यू डेमध्ये काही नवीन सुपरहिरोंच्या एन्ट्रीबाबत चर्चा होती. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
थोडक्यात सांगायचे तर, टॉम हॉलंडच्या दुखापतीमुळे स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डेच्या चाहत्यांना थोडा अधिक काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.