

Akshay Kumar Arrives for Season Finale Kapil Sharma the Great Indian Kapil Show
मुंबई - नेटफ्लिक्सला कपिल शर्मा शोमध्ये हेराफेरी चित्रपटातील बाबुरावचे पात्र विना परवानगी दाखवल्याने निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी तब्बल २५ कोटींची कायदेशीर नोटिस पाठवली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स पुन्हा एकदा कायदेशीर वादात अडकला आहे. लोकप्रिय कपिल शर्मा शोमध्ये ‘हेराफेरी’ चित्रपटातील बाबुराव गणपतराव आपटे (परेश रावल यांनी साकारलेले पात्र) विना परवानगी उपयोग करण्यात आला. या कारणावरून चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी नेटफ्लिक्सविरुद्ध तब्बल २५ कोटी रुपयांची कायदेशीर नोटिस पाठवली आहे.
‘हेराफेरी’ हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी चित्रपटांपैकी एक मानले जाते. बाबुरावचे पात्र आणि त्याचे डायलॉग्स आजही लोकांच्या तोंडी आहेत. त्यामुळे हे पात्र परवानगीशिवाय वापरणे हा कॉपीराइटचा भंग असल्याचा ठपका नाडियाडवाला यांनी ठेवला आहे.
काय म्हणाले फिरोज नाडियाडवाला?
निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी एक अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. यामध्ये कपिल शर्मा शोच्या निर्माते आणि नेटफ्लिक्सवर त्यांचा चित्रपट हेरा फेरी फ्रेंचायजीचे प्रसिद्ध पात्र ‘बाबूराव गणपतराव आपटे’ विना परवानगी वाररण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटलंय की, बाबुराव हे फक्त एक पात्र नाही तर हेरा फेरीचा आत्मा आहे. या पात्राचा वारसा आपल्या कठोर परिश्रमाने, दीर्घकालीन दृष्टीने आणि सर्जनशीलतेने बांधला गेला आहे. परेश रावल यांनी ही भूमिका मनापासून आणि आत्म्याने साकारली आहे. त्यामुळे, या पात्राचा स्वतःच्या व्यवसायासाठी आणि नफ्यासाठी गैरवापर करण्याचा कोणालाही अधिकार नाही.
याबाबत बोलताना निर्मात्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, “चित्रपटातील कोणतेही पात्र हे निर्मात्याच्या परवानगीशिवाय व्यावसायिक वापरासाठी वापरता येत नाही. बाबुराव हे पात्र लोकांच्या मनात अजरामर आहे, आणि त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यास कायदेशीर कारवाई करणे भाग पडते.”
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ च्या आगामी एपिसोडचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला होता. यामध्ये अक्षय कुमारने एन्ट्री घेतली होती. दरम्यान, किकू शारदा बाबुराव बनून येतो.
फिरोजने नेटफ्लिक्स आणि शोच्या मेकर्सना जी नोटिस पाठवली आहे, त्यामध्ये कॉपीराईट उल्लंघन आणि ट्रेडमार्क उल्लंघनचे आरोप करण्यात आले आहेत. फिरोज नाडियाडवाला यांच्या माहितीनुसार, ‘बाबूराव’च्या पात्राचा ट्रेडमार्क नाडियाडवाला परिवाराच्या नावे रजिस्टर्ड आहे. त्यांनी नेटफ्लिक्स आणि शोच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवत २५ कोटी रुपयांचा दंड आणि नुकसान भरपाईची मागणी केलीय.