

Jolly LLB 3 Box Office Collection
मुंबई - बहुचर्चित चित्रपट जॉली एलएलबी 3 ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. अक्षय कुमार-अर्शद वारसी यांच्या जुगलबंदीने चित्रपटगृहे दणाणली आहेत. जॉली एलएलबी ३ चित्रपटगृहात रिलीज होताच पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
याआधीचे या फ्रेंचायजी दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर यश मिळवण्यात अव्वल ठरली आहेत. आता तिसरा भाग देखील मागे नाही. रिलीज होताच पहिल्या दिवशी आकडे समोर आले. फर्स्ट डे कलेक्शनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ओपनिंग चांगले ठरल्याने विकेंडचा पूरेपूर फायदा होणार असल्याचे संकेत दिसताहेत.
सुभाष कपूर दिग्दर्शित हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने मोठ्या पडद्यावर स्वत: ला सिद्ध केलं आहे की, तो बॉलिवूडचा रिअल खिलाडी आहे. तर अर्शदने देखील आपल्या अचूक टायमिंगने प्रक्षकांना खुर्चीला किळवून ठेवलं आहे. प्रेक्षकांसोबतच चित्रपट समीक्षकांकडून चित्रपटाची वाहव्वा होताना दिसतेय.
द बंगाल फाईल्स - १.५० कोटी
मालिक - ३.५० कोटी
मेट्रो इन दिनों - ४.०५ कोटी
ग्राउंड जीरो - १.१५ कोटी
केसरी चॅप्टर २ - ७.८४ कोटी
द डिप्लोमेट - ४.०३ कोटी
सन ऑफ सरदार २ - ७.५० कोटी
धडक २ - ३.६५ कोटी
मां - ४.९३ कोटी
सितारे जमीन पर - १०.७० कोटी
भूल चूक माफ - ७.२० कोटी