The Rajasaab BO Collection | तगडे स्टारकास्ट तरीही द राजासाबची कासवगतीने वाटचाल, विकेंड असूनही कमाईत घसरण

Prabhas The Rajasaab BO Collection- तगडे स्टारकास्ट तरीही ‘द राजासाब’ची बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी
prbhas
The Rajasaab BO Collection x account
Published on
Updated on
Summary

‘द राजासाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र बॉक्स ऑफिसवर त्याची कामगिरी सध्या संथ असल्याचं चित्र दिसत आहे. तगडं स्टारकास्ट असूनही विकेंडमध्ये अपेक्षित उचल न मिळाल्याने कमाईत घसरण झाली असून चित्रपटाची पुढील वाटचाल आव्हानात्मक ठरत आहे.

Prabhas The Rajasaab Box Office Collection day 3

मोठ्या स्टारकास्टसह प्रदर्शित झालेला ‘द राजासाब’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेइतकी प्रभावी कामगिरी करताना दिसत नाही. चित्रपटाच्या घोषणेनंतरपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती, मात्र रिलीज झाल्यानंतरच्या काही दिवसांतच चित्र वेगळंच असल्याचं समोर आलं आहे.

prbhas
Sanjay Dutt | 'द राजा साब' रिलीज होताच संजय दत्त पशुपतिनाथ दर्शनाला, व्हिडिओ व्हायरल

चित्रपटाला भक्कम कलाकार, मोठा बजेट आणि आकर्षक प्रमोशनचा फायदा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात बॉक्स ऑफिसवर त्याची वाटचाल सध्या कासवगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे शनिवार-रविवार विकेंडला चित्रपटाला फारसा फायदा झालेला दिसले नाही. उलट काही ठिकाणी घसरण पाहायला मिळाली.

तीन दिवसांतील कलेक्शन

द राजासाबने पहिल्या दिवशी ५३.७५ कोटी रुपये तर दुसऱ्या दिवशी २६ कोटींची कमाई केलीय. तिसऱ्या दिवशी (रविवार, ११ जानेवारी) रोजी बॉक्स ऑफिसवर २०.१२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. ती दिवसात एकूण २०९.०२ कोटींची कमाई राजासाबने केली आहे.

prbhas
New TV serial | 'नवरी मिळे हिटलर'ला नंतर लीलाची आणखी एक मालिका, वल्लरीला कशी मिळाली भूमिका?

एकीकडे, द राजासाबला बॉक्स ऑफिसवर चांगली प्रतिक्रिया मिळत आहे तर दुसरीकडे, कमाईमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. प्रभासचा हा पहिलाच हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये संजय दत्त देखील दिसत असून तो विलेनच्या भूमिकेत दिसत आहे. निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे चित्रपटाच्या कमाईत घसरण होत असून रविवार विकेंडला देखील चित्रपटाच्या कमाई कासवगतीने सुरु आहे.

'द राजा साब' ९ जानेवारीला रिलीज झालाय. बॉक्स ऑफिसवर ओपनिंग डेला जगभरात १००.६० कोटींची कमाई केली. प्रभासच्या आधीच्या 'बाहुबली २: द कंक्लूजन', 'साहो', 'आदिपुरुष', 'सलार पार्ट १ : सीजफायर' आणि 'कल्कि २८९८ एडी' या सहाही चित्रपटांनी ओपनिंग डेला जबरदस्त कलेक्शन केले होते. आता यामध्ये द राजासाबची भर पडली.

पण दुसरे दिवशी कमाईचे आकडे घसरले. या चित्रपटाचे दिग्दर्शन मारुति यांनी केली आहे. 'द राजा साब'ने प्रीव्ह्यू शोतून ९.१५ कोटी कमावले होते. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ५३.७५ कोटींची कमाई केली होती. ५१.६३ टक्के घसरण झाल्यानंतर २६ कोटी कमावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news