

‘द राजा साब’ या चित्रपटाच्या रिलीजच्या निमित्ताने अभिनेता संजय दत्त चर्चेत असतानाच, त्याने नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले. संजय दत्तचा हा श्रद्धेचा क्षण टिपलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्याच्या साधेपणाचे आणि भक्तीभावाचे कौतुक होत आहे
sanjay dutt the raja saab release pashupatinath darshan
संजय दत्त आणि प्रभास स्टारर चित्रपट 'द राजा साब' आज चित्रपटगृहामध्ये रिलीज होत आहे. संजय दत्त शुक्रवारी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये पशुपतिनाथ मंदिर पोहोचला आणि पूजा केली. एका कसीनोच्या उद्घाटन प्रसंगी तो काठमांडू येथे पोहोचला होता. यावेळी फॅन्सची प्रचंड गर्दी मंदिर परिसरात झाली होती. मंदिरातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं की, त्याच्या आजूबाजूला सिक्युरिटी आहे. त्याच्या गळ्यात हार आणि माळा दिसताहेत.
खतरनाक भूमिकेत संजय दत्त
'द राजा साब' रिलीज होताच संजय दत्त दर्शनासाठी पोहोचला. 'द राजा साब' ९ जानेवारीला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. तो या चित्रपटात एका खतरनाक भूमिकेत दिसत आहे. 'द राजा साब'चे दिग्दर्शक मारुति असून यामध्ये बोमन ईरानी, मालविका मोहनन, निधि अग्रवाल, रिद्धि कुमार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र रिव्ह्यू
या चित्रपटाला चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र रिव्ह्यू मिळाले आहेत. ओपनिंग डेला चित्रपटगृह गर्दीने फुलले होते. एका रिपोर्टनुसार, प्रभासचा चित्रपट द राजा साबने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ४५ कोटी रुपये कमावले आहेत. प्री-रिलीज आणि पहिल्या दिवशीची कमाई असे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन ५४.१५ कोटी रुपये झाले आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘द राजा साब’ने पहिल्या दिवशीच्या कमाईत ब्लॉकबस्टर धुरंधरला मागे टाकले आहे. धुरंधरने २८ कोटींचे ओपनिंग केले होते.