Christopher Nolan :डोकं फिरवणारे पण, डोळे खिळवून ठेवणारे नोलनचे ‘हे‘ चित्रपट एकदातरी पाहाच!

Namdev Gharal

Following (1998) हा नोलनचा पहिला चित्रपट होता एका तरुण लेखकाची अनोळखी लोकांना गुपचूप पाठलाग करण्याची सवय त्याला गुन्हेगारीच्या गुंतागुंतीत ओढते, ही एक थरारक कथा आहे.

Memento (2000) – एका स्मृती हरवलेल्या व्यक्तीची प्रतिक्षण उलट्या क्रमाने उलगडणारी थरारक कथा.

Insomnia (2002) – अलास्कामधील अखंड दिवसाच्या प्रकाशात, एक पोलीस अधिकारी खुनाचा तपास हाती घेतो आणि मानसिक संघर्षाचा सामना करतो.

Batman Begins (2005) –DC Comics मधील बॅटमॅन सिरीजमधील ब्रूस वेन (क्रीस्‍टिअन बेल) या उद्योगपतीचा बॅटमॅन होण्याचा प्रवास आणि गॉथम शहराच्या रक्षणासाठीची सुरुवात.

The Prestige (2006) – दोन जादूगारांमधील स्पर्धा त्यांच्या आयुष्याला विध्वंसाकडे नेत असल्याची उत्कंठावर्धक कहाणी नोलनने मांडली आहे

The Dark Knight (2008) – बॅटमॅन आणि जोकर यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नीतिमूल्यांची कसोटी पाहणारा सुपरहीरो थ्रिलर चित्रपट

Inception (2010) – मानवाच्या स्‍वप्नांचा अर्थ, स्‍वप्नातील - स्‍वप्नांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्‍न या चित्रपटात नोलनने केला आहे. थरारक कथा आणि पकड घेणार हा चित्रपट

The Dark Knight Rises (2012) – गॉथम शहराच्या विनाशासाठी आलेल्या 'बेन'ला (Tom Hardy) थांबवण्यासाठी बॅटमॅन पुन्हा उभा राहतो.

Interstellar (2014) – पृथ्वी कधी ना कधी नष्‍ट होणार यासाठी मानवजात दुसरा राहण्यायोग्‍य ग्रह शोधत आहे. यावर आधारित हा चित्रपट काळ - अंतराळ- भावना यांचा अनोखा संगम आहे.

Dunkirk (2017) – दुसऱ्या महायुद्धातील डंर्किर्कच्या समुद्र किनाऱ्यावर युद्धात अडकलेल्या सैनिकांचे तीन दृष्टिकोनांतून मांडलेले थरारक चित्रण.

Tenet (2020) – वेळेच्या उलट्या प्रवाहाचा वापर करत भविष्यातील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुप्तहेराची क्लिष्ट आणि वेगवान कथा पाहायला मिळते.

Oppenheimer (2023) – अणुबॉम्बच्या निर्मितीमागील वैज्ञानिक रॉबर्ट ओपेनहायमरच्या नैतिक आणि वैयक्तिक संघर्षांची गूढ आणि वास्तवाधारित कहाणी सांगणारा हा चरित्रपट.