Sonam Wangchuk: 'सोनम वांगचुक यांनी...'; आमिर खानची भावनिक प्रतिक्रिया, '3 इडियट्स'मधील 'रँचो'बाबतही केला मोठा खुलासा

Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल अभिनेता आमिर खान यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Aamir Khan Sonam Wangchuk Hunger Strike
Aamir Khan Sonam Wangchuk Hunger StrikePudhari
Published on
Updated on

Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून बेमुदत उपोषणावर आहेत. त्यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात असतानाच आता अभिनेता आमिर खान यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कार्यक्रमात आमिर खान यांना सोनम वांगचुक आणि '3 इडियट्स' चित्रपटातील 'रँचो' या पात्राबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेवर स्पष्ट भूमिका मांडली.

'रँचो' हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही

आमिर खान म्हणाले की, '3 इडियट्स' चित्रपटाची निर्मिती सुरू असताना त्यांना सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहितीच नव्हती. त्यामुळे चित्रपटातील 'रँचो' हे पात्र त्यांच्यावर आधारित असल्याचा दावा चुकीचा आहे.

त्यांनी सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी, लेखक अभिजात जोशी आणि स्वतः त्यांना त्या काळात सोनम वांगचुक यांची माहिती नव्हती. त्यामुळे हा केवळ गैरसमज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Aamir Khan Sonam Wangchuk Hunger Strike
Sonam Wangchuk Hunger Strike: 'सोनम वांगचुक यांना काही झालं तर?' दिल्ली हायकोर्ट गंभीर; सरकारला दिले तातडीचे आदेश

सोनम वांगचुक यांच्या कार्याचं कौतुक

आमिर खान यांनी सोनम वांगचुक यांच्या कार्याचं मात्र मनापासून कौतुक केलं. ते म्हणाले की, त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा आदर करण्यासाठी 'रँचो' हे पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची गरज नाही. त्यांनी केलेले काम प्रेरणादायी आणि प्रशंसनीय आहे.

'त्यांनी उपोषण संपवावं'

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आमिर खान म्हणाले, "आम्ही सर्वजण त्यांच्या आरोग्याबद्दल आणि आयुष्याबद्दल चिंतित आहोत. त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं, अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी स्वतःच्या प्रकृतीचीही काळजी घ्यावी."

Aamir Khan Sonam Wangchuk Hunger Strike
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 18 वा दिवस, प्रकृतीबाबत अपडेट; 7 बड्या कलाकारांचा पाठिंबा

20 दिवसांपासून उपोषण सुरू

सोनम वांगचुक हे दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी असून, NEET परीक्षा गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या उपोषणाचा कालावधी आता 20 दिवसांवर पोहोचला असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, याआधीही अनेक अभिनेते, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी सोनम वांगचुक यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news