The Kerala Story 2 Goes Beyond |उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा, अदिती भाटिया यांचे नवे पोस्टर रिलीज होताच चर्चेत 'केरल स्टोरी-२'

The Kerala Story 2 Goes Beyond | विपुल शाह यांच्या 'केरळा स्टोरी २'चे नवे पोस्टर लॉन्च, उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा, अदिती भाटिया प्रभावी भूमिकेत
The Kerala Story 2 Goes Beyond new poster
The Kerala Story 2 Goes Beyond new poster launched instagram
Published on
Updated on
Summary

‘केरळा स्टोरी’नंतर आता ‘केरळा स्टोरी 2’चं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून, या चित्रपटाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ‘Goes Beyond’ या टॅगलाइनमुळे कथानक अधिक व्यापक असणार असल्याचे संकेत मिळत असून, उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

The Kerala Story 2 Goes Beyond new poster released

दिग्दर्शक आणि निर्माते विपुल शाह यांच्या बहुचर्चित चित्रपट ‘केरळा स्टोरी’नंतर आता त्याचा सिक्वेल ‘केरळा स्टोरी २’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 'द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड'मधील प्रमुख महिला कलाकारांचे कॅरेक्टर पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहे. दिग्दर्शक, निर्माते विपुल अमृतलाल शाह द केरल स्टोरी २ घेऊन येत आहेत. याआधी त्यांनी आंखें, नमस्ते लंडन, सिंग इज़ किंग, फोर्स, कमांडो: अ वन मॅन आर्मी आणि हॉलिडे: अ सोल्जर इज़ नेवर ऑफ ड्युटी यांसारख्या चित्रपट आणले आहेत.

The Kerala Story 2 Goes Beyond new poster
Ram Charan welcome Twins | चिरंजीवीचा आनंद गगनात मावेना; राम चरण दुसऱ्यांदा झाला पिता, पत्नी उपासनाच्या पोटी जुळ्यांचा जन्म

विपुल शाह आता द केरल स्टोरी २: गोज़ बियॉन्ड या सिक्वेलसह परत येत आहेत. आगामी भागात अधिक गडद, अधिक खोल आणि अधिक अस्वस्थ करणारी कथा आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये वास्तवाला भिडणारी कथा समोर येणार असल्याची झलक दिसते.

या चित्रपटात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तिघीही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील पात्रं साकारणार असल्याचं बोललं जात आहे. पोस्टरमध्ये त्यांचा आत्मविश्वासपूर्ण आणि गंभीर लूक पाहायला मिळतो. हे दृश्य अत्यंत भयावह आणि अस्वस्थ करणारे आहे. प्रत्येक पोस्टरमध्ये अभिनेत्रींचा क्लोज-अप दाखवण्यात आला आहे, ज्यात अश्रूंनी भरलेला एक डोळा दिसतो, तर उरलेल्या अर्ध्या भागावर जखमा आणि वाहणारे अश्रू स्पष्टपणे जाणवतात.

The Kerala Story 2 Goes Beyond new poster
Mardaani 3 Box Office Collection : दुसऱ्या दिवशी 'मर्दानी'च्या कमाईत घसरण, बॉर्डर २ ने पछाडले

निर्मात्यांनी हे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. द केरल स्टोरी २: गोज बियॉन्ड ही तीन हिंदू मुलींची अस्वस्थ करणारी कथा आहे, प्रेम आणि नंतर छळ, शोषण...भीती, मानसिक आघातांच्या गर्तेत ते अडकतात. आशिन ए. शाह चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news