रणबीर- आलियाच्या ‘ ब्रह्मास्त्र ’ चा फर्स्ट लूक आला समोर

रणबीर- आलियाच्या ‘ ब्रह्मास्त्र ’ चा फर्स्ट लूक आला समोर

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची गेल्या पाच-सहा वर्षांपासून चर्चेत आहे. आता बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंन्स्टाग्रामवर ' ब्रह्मास्त्र ' या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

त्याआधी मंगळवारी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात रणबीर कपूर दिसतो. त्याच्या भूमिकेचे नाव 'शिवा' असे आहे आणि त्याच्या हातातून आग बाहेर पडताना दाखवली आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओला अमिताभ बच्चन यांचा आवाज आहे.

या चित्रपटात मौनी रॉय, डिंपल कपाडिया, नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत. तर शाहरूख खान या चित्रपटात कॅमियो करत आहे. हा चित्रपट तीन भागांत बनणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news