ही दिवाळी बॉलीवूडला नक्कीच पावली आहे असे दिसून येत आहे. या दिवाळीमध्ये थामा आणि एक दिवाने की दिवानियत हे दोन सिनेमे रिलीज झाले आहेत. या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळाली आहे. (Latest Entertainment News)
आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना आणि नवाजूद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भूमिका असलेला थामाने पहिल्याच दिवशी बॉलीवूडच्या टॉप 5 ओपनिंग सिनेमा क्लबमध्ये आला आहे. तर हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवाचा रोमॅंटिक सिनेमा एक दिवाने की दिवानियतलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सिनेमांनी त्यांच्या मुख्य अभिनेत्यांना म्हणजेच आयुष्मान खुराना आणि हर्षवर्धन राणे यांना त्यांच्या सिनेमासाठी आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात ओपनिंग मिळाली आहे. आता मिळालेला प्रतिसाद येत्या काही दिवसांत अजून वाढू शकतो.
थामाने आतापर्यंत पहिल्याच दिवशी कमाईमध्ये सैय्याराला मागे सोडले आहे. थामा जवळपास 5000 थिएटरवर रिलीज झाला आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या कांतारा 1 चा जोर थोडा कमी झाला आहे. कांतारा 1 ने 20 व्यय दिवशी 4 कोटी कमावले आहेत. अर्थात या दोन्ही सिनेमांना दिवाळीच्या सुट्टीचा लाभ मिळणार आहे.
थामाने पहिल्या दिवशी 24.25 कोटींची कमाई केली आहे. यातले 24 कोटी हिन्दी सिनेमाचे आहेत तर 25 लाख या सिनेमाच्या तेलुगू व्हर्जनने कमावले आहेत. तर दुसरीकडे एक दिवाने की दिवानियत सिनेमाने पहिल्याच दिवशी 8.50 कोटींचा बिझिनेस केला आहे.
2025 मध्ये सर्वात जास्त ओपनिंग केलेल्या सिनेमांच्या यादीत छावा अजूनही नंबर एकला आहे. तर थामा हाऊसफुलला मागे टाकत थामा नंबर 4 ला पोहोचला आहे.