Rishabh Tandon: घरच्यांसोबतची दिवाळी ठरली अखेरची! वयाच्या 35 व्या वर्षी गायक – अभिनेत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी तो दिल्लीला गेल्याचे समजते
Entertainment
35 व्या वर्षी गायक – अभिनेत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यूpudhari
Published on
Updated on

प्रसिद्ध अभिनेता गायक रिषभ टंडन याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. निधनावेळी रिषभ दिल्लीमध्ये होता. घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी तो दिल्लीला गेल्याचे समजते आहे. (Latest Entertainment News)

रिषभला फकीर म्हणूनही ओळखले जात होते. रिषभच्या अशा अचानक जाण्याने त्याचे घरचे आणि मित्रमंडळीना धक्का बसला आहे. रिषभचे सोशल मिडियावर पाच लाखांहून आधीक फॉलोअर होते. रिषभच्या मित्रांनी त्याच्या मृत्यूची बातमी सोशल मिडियावर शेयर केली. रिषभ त्याच्या पाळीव प्राण्यावर असलेल्या प्रेमासाठीही ओळखला जात होता.

Entertainment
Bigg Boss Voice: बिग बॉसचा आवाज असलेले विजय विक्रम सिंह यांना किती पैसे मिळतात?

प्रसिद्ध पापाराझी विरल यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत म्हणाले की, ‘मनोरंजन जगतामधून एक दुखद गोष्ट समोर येत आहे. प्रसिद्ध  गायक अभिनेता रिषभ टंडन याचे निधन झाले आहे. कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीला गेलेल्या रिषभला तिथेच अटॅक आला.

Entertainment
Deepika - Ranveer | दीपिका - रणवीरची मुलगी ‘दुआ’ आहे गोड आणि क्युट!

रिषभ त्याच्या पाळीव श्वान आणि पत्नीसह मुंबई येथे रहात होता. करियर दरम्यान रिहाभ वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. अभिनेत्री सारा खान हिच्यासोबत त्याचे नाव जोडले जात होते. हे नाते लग्नापर्यंत गेल्याचा अनेकांचा अंदाज होता. पण साराने या अफवाच असल्याचे सांगितले. रिषभने त्यानंतर रशियन ओलेस्या नेडोबेगोवा हिच्याशी लग्न केले. एका प्रोजेक्ट दरम्यान त्याची आणि ओलेस्या ची भेट झाल्याचे त्याने सांगितले होते. रिषभच्या कुटुंबीयांनी यावेळी त्यांच्या प्रायवसीचा आदर केला जावा असे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news