‘द केरळ स्टोरी’मुळे देशभरात मोठी चर्चा निर्माण करणारे निर्माता विपुल अमृतलाल शाह आता ‘Beyond The Kerala Story’ या नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, त्याची रिलीज डेटही जाहीर आले आहे.
Beyond The Kerala Story new title teaser and release date announced
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने बॉलीवूडसह देशभरात मोठी खळबळ उडवली होती. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. तर त्यास वादांचाही सामना करावा लागला. आता या चित्रपटाचे निर्माता विपुल अमृतलाल शाह यांनी आणखी एक मोठी घोषणा करत ‘Beyond The Kerala Story’ या नव्या चित्रपटाची अधिकृत माहिती दिली आहे.
विपुल शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली असून, ‘Beyond The Kerala Story’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे या घोषणेसोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
सनशाईन पिक्चर्स लिमिटेडने चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करत एक मोशन पोस्टर शेअर करण्यात आला आहे...
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने बॉलीवूडसह देशभरात मोठी खळबळ उडवली होती. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. तर त्यास वादांचाही सामना करावा लागला. आता या चित्रपटाचे निर्माता विपुल अमृतलाल शाह यांनी आणखी एक मोठी घोषणा करत ‘Beyond The Kerala Story’ या नव्या चित्रपटाची अधिकृत माहिती दिली आहे.
विपुल शाह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली असून, ‘Beyond The Kerala Story’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे या घोषणेसोबतच चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
बियॉन्ड द केरळ स्टोरी’ यादिवशी होणार रिलीज
विपुल अमृतलाल शाह आणि सनशाईन पिक्चर्स लि. चित्रपट ‘द केरळ स्टोरी २’ अर्थातच ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ची रिलीज डेट आणि रिलीज तारखेची घोषणा केली आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे.
कथेमध्ये काय?
ही कथा वास्तव सत्य घटनांवर आधारित असणार आहे. पीडितांचे आवाज, दडपल्या गेलेल्या सत्य कथा, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकणारी कहाणी आहे.
काय म्हणाले विपुल शाह-
''ही फक्त एक कथा आहे. त्यांनी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. तिला बदनाम करण्याचाही प्रयत्न झाला. पण सत्य थांबले नाही. कारण काही कथा कधीच संपत नाहीत. या वेळी कथा आणखी खोलवर जाते. या वेळी वेदना अधिक तीव्र आहेत.''
‘द केरळ स्टोरी’ने (२०२३ ) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते कामाख्या नारायण सिंग यांनी केले आहे. सह-निर्मिती आशीष ए. शाह यांची आहे.