

अभिनेत्री मृणाल ठाकूर नव्या वर्षात पाऊल टाकताना मागील डिसेंबरमधील गोड आठवणींना उजाळा देत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या खास डिसेंबर फोटो डंपमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या एका कमेंटने या पोस्टला विशेष लक्ष वेधून घेतले आहे. मृणाल ठाकूरने इन्स्टाग्रामवर डिसेंबर महिन्यातील अनेक खास क्षण शेअर केले आहेत. या फोटो डंपमध्ये मृणालने आपल्या आई-वडिलांसोबतचेही काही खास क्षण शेअर केले आहेत.
एका फोटोमध्ये ती आपल्या पालकांसोबत यॉटवर बसलेली आहे, तर दुसर्या फोटोमध्ये तिचे वडील सांता क्लॉजसोबत फोटो काढताना दिसतात. या फोटोंमधून मृणालचा कुटुंबावर असलेला प्रेमभाव स्पष्ट होतो. या फोटो मालिकेत अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचाही एक खास फोटो आहे. त्या फोटोमध्ये तमन्ना बेईज-गोल्डन रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसते, तर मृणालने स्टायलिश बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. मृणालच्या पोस्टवर कमेंट करताना तमन्नाने तिला ‘माय क्युटी’ असे म्हटले आणि ही कमेंट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
चाहत्यांना या दोघींची मैत्री फारच भावली आहे. कामाच्या आघाडीवर बोलायचे झाले, तर मृणाल ठाकूर तिच्या आगामी चित्रपट ‘डाकू’साठी खूप उत्सुक आहे. हा एक अॅक्शनपट असून, यात ती अदिवी सेश आणि अनुराग कश्यप यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘डाकू’ चित्रपट 19 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यानंतर मृणाल ठाकूर ‘दो दिवाने शहर में’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे.