Tere Ishk Mein Day 1: धनुष–कृति सेननचा ‘तेरे इश्क में’ आज रिलीज होणार; पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई करणार?

Tere Ishk Mein BO Day 1 Prediction: ‘तेरे इश्क में’ ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल 2.40 लाख तिकिटांची विक्री करत चांगली सुरुवात केली आहे. ट्रेड पंडितांच्या मते, चित्रपट पहिल्या दिवशी 9 ते 11 कोटींची ओपनिंग करू शकतो.
Tere Ishq Mein Box Office
Tere Ishq Mein Box Office Pudhari
Published on
Updated on

Tere Ishq Mein Box Office Prediction: धनुष आणि कृति सेनन यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘तेरे इश्क में’ आज, 28 नोव्हेंबरला देशभरात प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटाबद्दल उत्सुकता आणखी वाढली होती. सध्या थिएटरमध्ये मोठ्या प्रतिस्पर्धी चित्रपटाचा अभाव असल्याने ‘तेरे इश्क में’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकतो.

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच कोट्यवधींची कमाई

Sacnilkच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

  • हिंदी (2D) मध्ये 2,14,414 तिकीट

  • तमिळ (2D) मध्ये 26,544 तिकीट

अशी मिळून 2,40,958 तिकिटांची विक्री झाली आहे.

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधूनच—

  • ब्लॉक सीट्स वगळता: ₹5.65 कोटी

  • ब्लॉक सीट्ससह: ₹9.26 कोटी

इतकी कमाई झाली असून, रात्रीच्या शोमधून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Tere Ishq Mein Box Office
Credit Score: आरबीआयचा नवा नियम; आता दर आठवड्याला अपडेट होणार क्रेडिट स्कोर; तुमच्यावर काय परिणाम होणार?

पहिल्या दिवशी किती ओपनिंग मिळू शकते?

ट्रेड विश्लेषकांच्या मते, चित्रपटाचा ट्रेलर पाहता आणि अ‍ॅडव्हान्स बुकिंग पाहता ‘तेरे इश्क में’ पहिल्या दिवशी 9 ते 11 कोटींची मजबूत ओपनिंग करू शकतो.

Tere Ishq Mein Box Office
Kantara Chapter 1: प्रचंड कमाईनंतर ‘कांतारा चॅप्टर 1’ आता OTT वर; जाणून घ्या ब्लॉकबस्टर चित्रपट कधी आणि कुठे पाहू शकता

जर असे झाले, तर हा चित्रपट धनुषच्या हिंदी करिअरमधील सर्वात मोठा ओपनर ठरेल. विशेष म्हणजे, या चित्रपटाने आपल्या रिलीजपूर्वच धनुषच्या ‘रांझणा’च्या (पहिला दिवस 5–6 कोटी) आकड्यांनाही मागे टाकले आहे.

रोमँटिक-इंटेन्स चित्रपट

या वर्षात ‘सैयारा’ आणि अलीकडील ‘एक दीवाने की दीवानियत’ सारख्या रोमँटिक आणि इंटेन्स ड्रामा चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. आता ‘तेरे इश्क में’ चित्रपटाचीही विकेंडपर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित हा चित्रपट नाट्य, प्रेम आणि भावनांनी रंगलेला असल्याने युवा प्रेक्षकांमध्ये विशेष पसंती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news